Khichdi Scam: अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाणांच्या अडचणीत वाढ होणार? आर्थिक गुन्हे शाखेकडून दोघांना समन्स

Khichdi scam case : स्थालांतरित मजुरांना लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. या योजनेत घोटळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स पाठवण्यात आलाय.
Khichdi scam case
Khichdi scam caseSaam Tv
Published On

(सचिन गाड)

Khichdi Scam Case :

सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आलाय. दोघांना २५ तारखेला समन्स करण्यात आलाय. सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर या दोघांची कथित खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी केली जात आहे.(Latest News)

दरम्यान सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तर अमोल किर्तीकर हे शिंदे गटासोबत असलेले खासदार गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव आहेत. या दोघांची आर्थिक गुन्हे शाखेकडून या दोघांची या कथित खिचडी प्रकरणी चौकशी झाली होती. त्यावेळी अमोल किर्तीकर यांच्या खात्यात ५२ लाख तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात ३७ लाख रुपये जमा झाल्यानंतर त्यांची विचारणा करण्यात आली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चौकशी दरम्यान या दोघांनाही आपण, फोर्सवन या कंपनीचे कर्मचारी असल्याने त्यांना पगार म्हणून हे पैसे मिळाले असल्याचे सांगितले. दोघेही सल्लागार म्हणून या कंपनीसाठी काम करत असल्याचं जबाबत म्हटलं होतं.

काय आहे खिचडी घोटाळा?

कोरोना महामारीच्या काळात मुंबईत असलेल्या स्थालांतरित मजुरांना लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. याला भारत सरकारचेही त्याला समर्थन होते. या कामगारांना खिचडी देण्याचं कंत्राट ५२ कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या ४ महिन्यात ४ कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून याची चौकशी केली जात आहे.

Khichdi scam case
BMC Khichdi Scam: कथित खिचडी घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; मुंबई महापालिका उपायुक्तांना ईडीकडून समन्स

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com