मुंबई/पुणे

Kalyan Crime : नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर ५ महिने सामूहिक बलात्कार, 'त्या' व्हिडीओमुळे ८ जणांच्या काळ्या कृत्याचा भंडाफोड

Maharashtra Crime News: ठाणे जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर पाच महिन्यांपासून सात आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Dhanshri Shintre

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या कल्याण भागातून घृणास्पद प्रकार समोर आला आहे. नर्सिंगच्या १७ वर्षांच्या विद्यार्थिनीवर सात जणांनी भेटून सुमारे पाच महिन्यांपासून बलात्कार करत होते. ही घटना मोठ्या प्रमाणावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया निर्माण करत आहे.

पीडिता महाविद्यालीन विद्यार्थिनी असून एप्रिल महिन्यात तिने सोशल मीडियावर सात आरोपींपैकी एका व्यक्तीशी मैत्री केली होती. त्यानंतर, या आरोपीने तिच्या संमतीशिवाय त्यांच्यातील लैंगिक संबंधांचे व्हिडिओ सर्व एकाने दुसऱ्या मित्राला, दुसऱ्याने तिसऱ्याला असे करुन मित्रांमध्ये शेअर केले.

तसेच, यानंतर आरोपी आणि त्याचे सहकारी पीडितेवर धमक्या देत तिच्या विरोधात सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करत तिला ब्लॅकमेल करत होते. पीडितेच्या कुटुंबीयांना हा छळ करणारा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होताना दिसल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी विद्यार्थिनी गर्भवती असल्याचे मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे.

या गंभीर प्रकरणामुळे पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध मुलांचे संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या घटनेचा पथक तपास करत असून पुढील कारवाई करत आहे.

या गंभीर प्रकरणी अटक झालेल्या सातही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची गाडी व मोबाईल जप्त करत त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या वकिलांनी पीडितेच्या वयावर शंका व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. सद्यस्थितीत पुढील तपास आणि न्यायालयाचा निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hill Stations: कुठं, कुठं जायाचं हनिमूनला? बेस्ट ठरतील 'हे' हिल स्टेशनस

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात अडकलेल्या दोघांना सुखरूप वाचवलं

Moong Dal Tikki Recipe: मूग डाळ टिक्की क्रिस्पी होत नाहीये? मग हा १ पदार्थ करा मिक्स

GK : एक टिव्ही चॅनल ५ चित्रपट दाखवून किती पैसे कमवतात ? जाणून घ्या

Healthy Sleeping Tips: उशी घेऊन झोपण्याची सवयी आजपासून सोडा, शरीरात होतील आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT