Kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: मॉलमध्ये डिस्प्लेला लावलेला मोबाइल ढापला, हायप्रोफाईल 'बंटी बबली'ला तुरुंगवास

Priya More

अभिजीत देशमुख, कल्याण

मॉलमधील एका स्टोअरमध्ये डिस्प्लेला लावलेला महागडा मोबाइल चोरी करणाऱ्या बंटी बबलीला पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणमधील ही घटना असून कोळसेवाडी पोलिसांनी या तरुण-तरुणीला बेड्या ठोकल्या. मोबाइल चोरी करतानाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. याच सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

सागर साहू आणि प्रियंका मेनन अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरलेला मोबाइल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. या जोडीला शोधण्यासाठी पोलिसांनी तब्बल ६२ सीसीटीव्ही तपासले होते. आधी कल्याणमध्ये राहणाऱ्या प्रियंकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यानंतर मुंबई येथे राहणारा तिचा मित्र सागर साहूला पोलिसांनी अटक केली. दोघेही ठाण्यात इमिग्रेट कन्सलटंटचे काम करतात. त्यांना चांगल्या पगार आहे. मोबाइलची गरज होती त्यामुळे त्यांनी हा मोबाइल चोरी केला. मात्र सीसीटीव्हीमुळे त्यांच्या चोरीचे बिंग फुटले.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणचा मेट्रो मॉलमध्ये एक तरुण आणि तरुणी फिरण्यासाठी आले होते. फिरत असताना दोघे एका मोठ्या कंपनीच्या शोरुममध्ये गेले. शोरुममध्ये सर्व महागडे मोबाइल डिस्प्लेवर लावले होते. तरुणीने हातसफाई दाखवत डिस्प्लेवरील मोबाइल बॅगेत टाकला. त्यानंतर त्यांनी तिथून काढता पाय घेतला. मोबाईल चोरीला गेल्यानंतर शोरुम चालकाने सीसीटीव्ही तपासला. त्यात चोरीचा प्रकार कैद झाला होता.

या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी हेमंत ढोले यांनी तपास सुरु केला. मेट्रो मॉलमधून बाहेर पडताना तरुण-तरुणी सीसीटीव्हीत कैद झाले होते. दोघे सीसीटीव्हीत कल्याण स्टेशनपर्यंत जाताना दिसत आहेत. त्यानंतर पोलिसांनी या मार्गावरील आणखीन सीसीटीव्ही तपासले असता कल्याण पश्चिम जोशी बागेत लागलेल्या सीसीटीव्हीत एका घरात जाताना तरुणी दिसली. पोलिस पथकाने तिला ताब्यात घेतले. तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर तिने तिच्यासोबत असलेल्या तरुणाचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सागर साहूला अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT