Crime against women : संतापजनक! घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलींची वाट रोखली, ५ जणांकडून सामूहिक अत्याचार, परिसरात खळबळ

Crime against women in aruchan pradesh : घरी परतणाऱ्या २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अरुणाचल प्रदेशात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. तर देहरादूनमध्येही एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
 संतापजनक! घरी परतणाऱ्या २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार, लोकांमध्ये संतापाची लाट
Crime news Saam Tv file pic
Published On

नवी दिल्ली : कोलकाता महिला डॉक्टर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. संपूर्ण देशात डॉक्टर महिलेवरील अत्याचाराच्या विरोधात निषेध मोर्चे काढले जात आहेत. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. याचदरम्यान अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली आहे. अरुणाचल प्रदेशात एका १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. तर देहरादूनमध्येही १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार घडल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांवरून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अरुणाचल प्रदेशात अल्पवयीन मुलीवर अत्याचर

अरुणाचल प्रदेशातील अपर सुबनसिरी जिल्ह्यात घरी परतणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या १३ वर्षीय मुलीवर ५ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीवर सलग पाच दिवस अत्याचार केले जात होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 संतापजनक! घरी परतणाऱ्या २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार, लोकांमध्ये संतापाची लाट
Crime News : संतापजनक! डॉक्टरकडून 20 वर्षीय नर्सवर बलात्कार; खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. पाचही जण २५ ते ३५ वयोगटातील आहेत. घरी परतणाऱ्या मुलीचं ५ जणांनी अपहरण केलं. त्यानंतर एका आरोपीच्या घरात नेऊन आळीपाळीने अत्याचार केले. पाचव्या दिवशी मुलीने घरातून पळ काढून पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर तक्रार दाखल करत पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

उत्तर प्रदेशमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

उत्तराखंडच्या डेहरादूनमध्ये १६ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कडक कारवाई सुरु केली आहे. मूळच्या उत्तर प्रदेशातील १६ वर्षीय मुलीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

 संतापजनक! घरी परतणाऱ्या २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार, लोकांमध्ये संतापाची लाट
Crime News: संतापजनक! आठवीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार; मुख्याद्यापकासह 6 जणांना अटक

या घटनेनंतर अल्पवयीन मुलीचं मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे अनेकादा मुलीने जबाब बदलला. त्यामुळे पोलिसांनी पीडितेच्या नातेवाईकांची मदत घेतली. अनेकदा ही मुलगी घर सोडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाई सुरु केली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजनंतर पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बस ड्रायव्हर, कंडक्टर आणि आयएसबीटीच्या कॅशियरला अटक केली आहे. आरोपींचे नावेही समोर आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com