Kolsewadi Police Station in Kalyan, where two 60-year-old accused saam tv
मुंबई/पुणे

विकृतीचा कळस! ६० वर्षीय नराधमांचा 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; कल्याण हादरलं

15 year Old Minor Girl Assaulted In Kalyan East Kolsewadi: कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोन ६० वर्षीय नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी दोन आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोघे साठ वर्षाचे आहेत.

कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका परिसरात एका घरातून एका मुलीचा जोरात आवाज आला. मुलीचा ओरडाओरड सुरू असताना आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जाग आली. लोकांनी याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.

हे दोघे आरोपी रात्री घरात एक पंधरा वर्षाची मुलगी घेऊन आले होते. त्यामधील एक आरोपी चहा विक्रीच्या व्यवसाय करतो आणि एक आरोपी हा रिक्षा चालक आहे. मुलगी गरीब घरची आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आता या प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी याआधी यामुली सोबत किंवा आणखी काही मुली सोबत असा प्रकार केला आहे का? त्याच्या या प्रकारात किती लोक आहेत? याचा तपास आता पोलीस करीत आहेत. मात्र या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

Famous Singer Death: भारतीय संगीत विश्वाचा जादुई आवाज हरपला; ज्येष्ठ गायिका काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT