Kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: कल्याण हादरले! बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरची भावांकडून हत्या, मृतदेह उल्हास नदीत फेकला

याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) तिघांना अटक केली आहे.

Priya More

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan News: कल्याणमध्ये (Kalyan) भावांनी आपल्या बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरची (Live-In Partner) निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यामध्ये हातोडा घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह उल्हासनदीमध्ये फेकून देण्यात आला होता. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहबाज शेख असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शहबाज कल्याणजवळच्या टिटवाळा परिसरात राहत होता. त्याच्या दोन बायका आहेत. एक बायको टिटवाळ्यामध्ये राहते. तर दुसरीसोबत तो लिव्ह-रिलेशनशीपमध्ये राहत होता. लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या महिलेसोबत त्याचे सतत भांडण व्हायचे. या सततच्या भांडणाला ही महिला कंटाळली होती.

आपल्या बहिणीला शहबाज त्रास देत असल्याचे तिच्या भावांना माहिती होते. त्यामुळे या महिलेचेन दोन सख्खे भाऊ आणि एका मानलेल्या भावाने शहबाजला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. हे सुरु असताना अचानक शहबाज हा बेपत्ता झाला. शुक्रवारी शहबाज बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील आणि पोलीस निरिक्षक शरद जिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांनी तपास सुरु केला.

या प्रकरणात पोलिसांनी शहबाजची लिव्ह-इन पार्टनर असलेल्या महिलेच्या तीन भावांना ताब्यात घेतले. इसरार शेख, शोएब शेख आणि हेमंत बिछवाडे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान आरोपींनी शहबाजच्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींनी शहबाज शेखला एका रिक्षातून एका निर्जनस्थळी नेले. त्याच्या डोक्यात हातोडीने प्रहार केला. या हल्ल्यात शहबाजचा जागीच मृत्यू झाला. शहबाजची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह उल्हास नदीमध्ये टाकून दिला. पाण्याच्या प्रवाहामुळे मृतदेह वाहून गेला आहे. त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांकडून शोध सुरु आहे. जोपर्यंत शहबाजचा मृतदेह हाती लागत नाही. तोपर्यत या प्रकरणातील तपासाचा गुंता कायम आहे. आरोपींच्या कबुलीनंतर पोलीस वेगवेगळ्या अंगाने या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT