Dog News Saam TV
मुंबई/पुणे

Dog News : संतापजनक! श्वानाची निर्घृण हत्या; अर्ध जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

कल्याण पूर्व काटेमानिवली परिसरात राहणारे पियूष पालव शंभर फूटी रस्त्यावर नेहमी कुत्र्यांना जेवण देतात.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan Crime News : कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका निष्पाप श्वानाला जाळून मारण्यात आलं आहे. कल्याणच्या १०० फूट रोड परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Stray Dogs)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कल्याण पूर्व काटेमानिवली परिसरात राहणारे पियूष पालव शंभर फूटी रस्त्यावर नेहमी कुत्र्यांना जेवण देतात. शुक्रवारी सकाळी ते या परिसरात कुत्र्यांना जेवण देण्यासाठी गेले तेव्हा तेथे त्यांना एक कुत्रा अर्ध जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

अर्धवट जळलेल्या अवस्थेत या कुत्र्याचा मृतदेह असल्याने एखाद्या अज्ञात इसमाने त्याला जाळून मारल्याचे दिसून येत होते . या प्रकरणी पालवे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. तसेच आरोपी व्यक्तीचा देखील शोध सुरू आहे.

दरम्यान सदर घटना ही काळ्याजादूसाठी झाली असावी असं म्हटलं जात आहे. तर एखाद्या विक्रूत व्यक्तीने देखील असं करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्वानाची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

Kudal : प्रेमातून भयानक कृत्य, मुलीला जंगलात नेलं अन्..., २ महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

RBI Repo Rate: आरबीआयकडून नवीन रेपो रेट जारी; वाचा होम, कार लोनवर काय परिणाम होणार

Pune Viral Video : भर रस्त्यात तरूणीला लाथा बुक्क्यांनी मारलं, पुण्यात नेमकं चाललंय काय ? व्हिडिओ पाहून राग अनावर येईल

SCROLL FOR NEXT