Vaman Mathre Saam Digital
मुंबई/पुणे

Waman Mhatre : वामन म्हात्रेंना अटक होणार? कल्याण कोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला

Waman Mhatre Case :बदलापूर येथे झालेल्या आंदोलनावेळी वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबद्दल अर्वाच्च भाषा वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.

Sandeep Gawade

बदलापूर येथे झालेल्या आंदोलनावेळी वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबद्दल अर्वाच्च भाषा वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कल्याण न्यायालयाने या प्रकरणात वामन म्हात्रे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून सोडलं होतं. बदलापूरमध्ये संतप्त नागरिकांकडून तब्बल १२ तास रेलरोको आंदोलन करण्यात आलं. यादरम्यान शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराविषयी अर्वाच्य भाषा वापरली होती त्यामुळे संतापाची लाट उसळली होती. अखेर त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षांनी त्यांच्या अटकेची मागणी लावून धरली होती. त्यामुळे गु्न्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यानी कल्याण न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत दणका दिला आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 13 आणि 16 ऑगस्ट दरम्यान चार वर्षांच्या २ मुलींवर अत्याचाराच करण्यात आला होता. 18 ऑगस्टला तिच्या कुटुंबियांनी पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या घटनेच्या निषेधासाठी बदलापूरमध्ये पालक आणि नागरिकांनी उग्र आंदोलन सुरू केलं. तब्बल ११ तास रेल्वे सेवा रोखून धरली होती. या घटनेचं वार्तांकन अनेक पत्रकार करत होते. या घटनेचं गांभीर्य ओळखून प्रत्येक घटनेची माहिती लोकापर्यंत पोहोचवत होते.

या घटनेचे पहिल्यापासून वार्तांकन करणाऱ्या 'सकाळ'च्या मुंबई बदलापूर आवृत्तीच्या महिला पत्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे याने धमकी दिली. तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावर बलात्कार झाला आहे, अशी भाषा वामन म्हात्रे याने महिला वापरली होती. वामन म्हात्रे याच्या या भाषेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता कोर्टाने अटकपूर्व जामीनही फेटाळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT