Kalyan News Saamtv
मुंबई/पुणे

Kalyan News: कल्याणमध्ये धुळीचे साम्राज्य.. संतापलेल्या शिक्षक, विद्यार्थ्यांचा पालिका प्रशासनाला इशारा

Kalyan Latest News: महापालिकेला रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी 12 नोव्हेंबरपर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी

Kalyan News:

कल्याण शहरामध्ये रस्त्यांवर धुळीचं साम्राज्य पसरले आहे. याबाबत सिक्रेट हार्ट शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या व प्रभाग कार्यालयात आंदोलन केले होते. आज महापालिका आयुक्तांशी सेक्रेड हार्ट शाळेच्या शिक्षकांची बैठक झाली.

या बैठकीत महापालिकेला रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी 12 नोव्हेंबरपर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. 12 नोव्हेंबर पर्यंत जर धूळ साफ झाली नाही.. तर शिक्षकांसह विद्यार्थी शर्ट काढून रस्त्यांवरील धूळ साफ करतील असा इशारा केडीएमसी आयुक्तांना दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पावसाळ्यानंतर महापालिकेने रस्त्यांवर खड्डे बुजवण्याचे, रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. या कामामुळे कल्याण शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत रस्त्यांवरील धुळीबाबत सेक्रेड हार्ट शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या निवेदन दिले.

मात्र महापालिकेने दुर्लक्ष केल्याने काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढत रस्त्याची साफसफाई करत निषेध नोंदवला होता. आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी शाळा प्रशासनाच्या शिक्षकांसह जागरूक नागरिक संघटनेसोबत बैठक घेतली . यावेळी शाळेच्या शिक्षकांनी महापालिका प्रशासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान संकल्पनेचे वाटोळे करत असल्याचा आरोप केला.

या बैठकीत शिक्षकांनी महापालिकेला 12 नोव्हेंबर पर्यंत रस्त्यांवरील धूळ साफ करा असा अल्टिमेटम देण्यात आला आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत रस्त्यांवरील धूळ साफ केली नाही तर शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी शर्ट काढून त्याच शर्टने रस्त्यांवरील धूळ साफ करतील.. असा इशारा देखील देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकोटमध्ये भाजपकडून पैसे वाटप, विरोधकांचा आरोप

Suraj Chavan : येळकोट येळकोट जय मल्हार!बायकोला उचलून सूरज चव्हाण चढला जेजुरी गड, पाहा PHOTOS

Local Body Election : सर्वात मोठी बातमी! उद्या होणारी मतमोजणी रद्द, आता २१ डिसेंबरला उमेदवाराचे भवितव्य समजणार, हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Maharashtra Live News Update: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार

ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त; चांदीचे दर जैसे थे, १ तोळं सोन्याचा भाव किती?

SCROLL FOR NEXT