kalyan  Saam tv
मुंबई/पुणे

रीलस्टार प्रेम भाटी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल

kalyan News : रीलस्टार प्रेम भाटी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणी ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

रीलस्टार प्रेम भाटी याचा दुचाकी अपघात

रीलस्टारच्या अपघात प्रकरणात ठेकेदेरांवर गुन्हा

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून पुढील तपास सुरू

संघर्ष गांगुर्डे,साम टीव्ही

कल्याणच्या मोहने परिसरात रीलस्टार प्रेम भाटी याचा दुचाकी अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. रस्त्याच्या कामादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता निष्काळजीपणा केल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर संबंधित तीन ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेम भाटी हा दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीवरून वाहन घसरल्याने त्याचा गंभीर अपघात झाला होता. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला होता.

तपासादरम्यान संबंधित रस्त्याचे काम सुरू असताना ठिकाणी कोणतेही इशारा फलक, बॅरिकेड्स अथवा अन्य सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. तसेच रस्त्यावर खडी टाकून तीचे व्यवस्थित व्यवस्थापन करण्यात आले नसल्याचेही समोर आले. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेकेदारांवर ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी रस्त्याचे काम करणारे ठेकेदार निकी मोटवाणी,महेश भोईर आणि गणेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रेम भाटी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे रस्ते कामांदरम्यान सुरक्षिततेच्या नियमांचे पालन कितपत केले जाते, याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खडकपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

तत्पूर्वी, प्रेम भाटीचा सीसीटीव्ही फुटेज काल पोलिसांच्या हाती लागले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रेमचा रात्री उशिरा दुचाकी चालवताना रस्त्यावरील खडीमुळे अपघात झाल्याचे दिसत आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ हाती लागल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती. त्यानंतर आज मंगळवारी पोलिसांनी तीन ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! कार अन् दोन रिक्षांची एकमेकांना धडक, भीमाशंकरला गेलेले १२ भाविक गंभीर

Maharashtra News Live Update: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर

Rain Alert: राज्यात पावसाचा धुमाकूळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, ५ जिल्ह्यांना अलर्ट

Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

Monday Horoscope : ग्रहांची विशेष कृपा! ‘या’ 6 राशींच्या नोकरी-व्यवसायात होईल मोठी प्रगती; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT