Hair care Tips : केस बांधल्यावर चपटे दिसतात? स्ट्रेटनर-कर्लर न वापरता या ७ ट्रिक्स करा फॉलो; केसांना मिळेल क्लासी व्हॉल्यूम

Saam Tv

नैसर्गिक बाऊन्स आणि व्हॉल्यूम

केस धुतल्यानंतर किंवा बांधल्यानंतर एकदम चपटे दिसू लागतात. वारंवार स्ट्रेटनर किंव कर्लर वापरण्याऐवजी काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने केसांना नैसर्गिक बाऊन्स आणि व्हॉल्यूम देता येतो.

CONVERT FLAT HAIR INTO CLASSY HAIR VOLUME | PINTERST

केसांची पार्टिंग बदला

नेहमी एकाच बाजूने केसांची पार्टिंग केल्याने मुळं त्याच दिशेने बसतात.त्यामुळे केस चपटे दिसू शकतात. त्यामुळे अधूनमधून पार्टिंगची दिशा बदला. यामुळे मुळांना लगेच लिफ्ट मिळण्यास मदत होते.

CONVERT FLAT HAIR INTO CLASSY HAIR VOLUME

रात्री सैल बन किंवा वेणी घाला

झोपण्यापूर्वी केसांचा बन किंवा सैल वेणी घाला. केस खूप घट्ट बांधू नका. सैल केस बांधल्याने सकाळी केसांना मस्त बाऊन्स मिळेल.

CONVERT FLAT HAIR INTO CLASSY HAIR VOLUME

ड्राय शॅम्पूचा वापर करा

ड्राय शॅम्पू मुळांवर लावल्याने केसांचा चिकटपणा गायब होतो. मुळांजवळ थोडासा ड्राय शॅम्पू लाऊन मसाज केल्याने टेक्चर आणि व्हॉल्यूम मिळण्यास मदत होते.

CONVERT FLAT HAIR INTO CLASSY HAIR VOLUME

मुळांना हलक टिझ करा

कंगव्याच्या मदतीने क्राऊन एरियातील केस हलकेच टिझ करा. जास्त जोरात ओढू नका. त्यामुळे केसांना मस्त बाऊन्स मिळेल.

CONVERT FLAT HAIR INTO CLASSY HAIR VOLUME

रूट व्हॉल्यूमायझिंग प्रोडक्ट

केस धुतल्यानंतर मुळांजवळ हलके व्हाल्यूमायझिंग मूस किंवा रूट लिफ्ट स्प्रे वापरता येतो.

CONVERT FLAT HAIR INTO CLASSY HAIR VOLUME

स्कॅल्प मसाज करा

दररोज काही मिनिटं बोटांच्या टोकांनी स्कॅल्पचा हलका मसाज करा. यामुळे स्कल्पला आराम मिळतो आणि केसांच्या मुळांना हलकं लिफ्ट मिळू शकतं.

CONVERT FLAT HAIR INTO CLASSY HAIR VOLUME

मुळांवर जास्त कंडिशनर लावू नका

कंडिशनर केसांसाठी आवश्यक असला तरी तो थेट मुळांवर किंवा स्कॅल्पवर जास्त प्रमाणात लावल्यास केस जड आणि चपटे दिसू शकतात. त्यामुळे कंडिशनर केसांच्या मधल्या भागापासून टोकापर्यंत लावा.

CONVERT FLAT HAIR INTO CLASSY HAIR VOLUME

शेवटी थंड पाण्याने केस धुवा

शॅम्पू आणि कंडिशनर केल्यानंतर शेवटी थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे केस अधिक स्मूद आणि शायनी दिसण्यास मदत होते

CONVERT FLAT HAIR INTO CLASSY HAIR VOLUME

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

CONVERT FLAT HAIR INTO CLASSY HAIR VOLUME

Height Increase : वयानुसार उंची वाढत नाहीये? घाबरू नका! 'हे' सोपे उपाय करा अन् झपाट्याने वाढवा उंची

TIPS TO INCREASE HEIGHT | meta ai
येथे क्लिक करा