Kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: कल्याणमध्ये दरोडेखोरांचा प्लान फिस्कटला, पोलिसांना एक क्लू मिळाला, अन्...

Kalyan Crime News: एपीएमसी मार्केट परिसरात गुहारातहून येणाऱ्या धान्याचे व्यापारी व त्यांच्या वाहनांवर दरोडा घालण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Crime News:

एपीएमसी मार्केट परिसरात गुहारातहून येणाऱ्या धान्याचे व्यापारी व त्यांच्या वाहनांवर दरोडा घालण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहेत. एपीएमसी मार्केट परिसरात काही दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अवघ्या तासाभरात पोलिसांनी सापळा रचत चार दरोडेखोरांना बेड्या ठोकल्यात.

त्यांचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालेत. पोलीस या तिघांचा शोध घेत आहेत. आजीम गाझी, अरफात शेख उर्फ काल्या, अन्वर शहा, अरबाज शेख उर्फ बटला, अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर शफिक बगला अल्ताफ उर्फ कच्ची व जिओ हे तीन साथीदार पसार झालेत. हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक झालेल्या चार दरोडेखोरांकडून पोलिसांनी तीन चाकू, एक मिरची स्प्रेची बाटली, रिक्षा आणि रोकड जप्त केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील एपीएमसी मार्केटमध्ये गुजरातहून येणाऱ्या धान्य व्यापाऱ्यांच्या वाहनांवर दरोडा घालून लुटण्यासाठी काही दरोडेखोर मार्केट परिसरात जमले होते. याबाबतची माहिती कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याची हवालदार सचिन साळवी व पोलीस शिपाई आंधळे यांना मिळाली होती. (Latest Marathi News)

या माहितीच्या आधारे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे , यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते ,विनोद कालेकर यांच्या पथकाने एपीएमसी मार्केट परिसरात सापळा रचला.

या ठिकाणी काही इसम संशयास्पद रित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ या इसमांवर झडप टाकली . चौघांना ताब्यात घेतलं. मात्र यामधील तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. आजीम गाझी, अरफात शेख उर्फ काल्या, अन्वर शहा, अरबाज शेख उर्फ बटला अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर शफिक बगला अल्ताफ उर्फ कच्ची व जिओ हे तीन साथीदार पसार झालेत. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT