Kalyan Saptashrungi Building Slab Collapses Saam Tv News
मुंबई/पुणे

Kalyan News : ४० वर्ष जुनी इमारत, चौथ्या माळ्यावरील स्लॅब तळमजल्यापर्यंत कोसळला; कल्याणमध्ये 'सप्तशृंगी' बिल्डिंगमध्ये ६ जणांचा मृत्यू

Kalyan Saptashrungi Building Slab Collapses : कल्याण पूर्व चिकणी पाडा सुमारे चाळीस वर्ष जुनी असलेल्या सप्तशृंगी या पाच मजली इमारतीच्या चौथा माळ्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.

Prashant Patil

अभिजीत देशमुख, साम टिव्ही

ठाणे : कल्याण पूर्व चिकणी पाडा येथे सुमारे चाळीस वर्ष जुनी असलेल्या सप्तशृंगी या पाच मजली इमारतीच्या चौथा माळ्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. चौथा माळ्यावरील स्लॅब हा तळमजल्यापर्यंत कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दलाने व केडीएमसीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतलं . यादरम्यान अग्निशमन दलाने १२ जणांना बाहेर काढण्यात आलं. त्यामध्ये दिड वर्षाच्या मुलीसह चार महिला आणि एका इसमाचा मृत्यू झाला.

कल्याण पूर्व महाराष्ट्र नगर चिकणी पाडा येथे सप्तशृंगी इमारती आहे. तळ अधिक चार मजल्याची ही इमारत सुमारे ४० वर्ष जुनी आहे. या इमारतीमध्ये सुमारे ५० कुटुंब राहत होते. दुपारच्या सुमारास या इमारतीच्या एका बाजूचा चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. पत्त्याप्रमाणे हा स्लॅब तळमजल्यावर कोसळला. या दुर्घटनेत १० जण इमारतीमध्ये अडकले होते. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन विभाग, केडीएमसीचं पथक, पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केलं. चार तासांच्या अथक प्रयत्नांतर या इमारतीमधून १२ जणांना बाहेर काढण्यात यश आलं. हे सगळे गंभीर जखमी असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील दीड वर्षाची मुलगी नमस्वी शेलार, प्रमिला साहू (वय ५८), सुनीता साहू (वय ३७), सुजाता पाडी (वय ३२), सुशीला गुजर (वय ७८) आणि व्यंकट चव्हाण (वय ४२) यांचा मृत्यू झालाय तर उर्वरित ६ जणांवर कल्याण डोंबिवलीमधील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

सप्तशृंगी इमारत धोकादायक यादीत नव्हती

सप्तशृंगी इमारती धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितलं होतं. या इमारतीचे डागडुजीचे काम सुरू होते. आज जो भाग कोसळला त्यात भागातील चौथ्या माळ्यावरील फ्लोरिंगवर लाद्या बसवण्याचं काम सुरू होतं, आणि याचदरम्यान ही दुर्घटना घडली.

धोकादायक अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे धोकादायक इमारतींमध्ये राहणारे रहिवासी घरे रिकामे करण्यास तयार नसल्यानं काही इमारतींची प्रकरणं न्यायप्रविष्ठ असल्याने केडीएमसीसमोर या इमारती रिकामे करण्याचं आवाहन उभं ठाकलं आहे. इमारतींवर कारवाई झाल्यास जमीन मालक रहिवाशांना घरे देण्यास आडमुठे धोरण करत असल्याचा आरोप या इमारतीमध्ये राहणारे रहिवासी करतात. त्यामुळे इमारतींमधील रहिवासी आधी आमच्या पुनर्वसन करा मग इमारत तोडा, या भूमिकेवर अडून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT