Junnar News Saam Tv
मुंबई/पुणे

Junnar News: श्वास थांबला... हृदय थांबलं... तरी डॉक्टर थांबले नाहीत! सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचे वाचवले प्राण

Junnar News: जुन्नरमध्ये एका डॉक्टरांनी मृत्यूच्या दारात असलेल्या शेतकऱ्याला जीवनदान दिले आहे. कोब्रा सापाचा सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचे प्राण त्यांनी वाचवले आहेत.

Siddhi Hande

डॉक्टर हे देवाचे दुसरे रुप असतात असं म्हणतात. अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. कधीही आपल्या कर्तव्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे कितीतरी नागरिकांना जीवनदान मिळते. आज जागतिक डॉक्टर दिन साजरा केला जात आहे. याच दिवशी

माणुसकीचं, डॉक्टरी सेवेचं असं जिवंत उदाहरण पुणे जिल्ह्यात पाहायला मिळालं.जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील डॉ. सदानंद राऊत आणि डॉ. पल्लवी राऊत या डॉक्टर दांपत्याने मृत्यूच्या दारात असलेल्या एका शेतकऱ्याला जीवदान दिलंय. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज एका शेतकऱ्याचा जीव वाचला आहे. त्याला पुन्हा एकदा जीवनदान मिळालं आहे.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावातील एका शेतकऱ्याला शेतात काम करताना विषारी कोब्रा सर्पाने दंश केला. त्या व्यक्तीला रुग्णालयात आणेपर्यंत त्याचे हृदयाचे ठोके थांबले होते, श्वासही बंद झाला होता. मात्र, राऊत दाम्पत्याने तातडीने उपचार केले. त्यांच्या उपचारामुळे शेतकरी बरा झाला आहे.

फक्त एवढंच नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून राऊत दांपत्य सर्पदंश झालेल्या हजारो रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. आतापर्यंत १०,००० हून अधिक सर्पदंश रुग्णांना त्यांनी जीवदान दिलं आहे. आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त हे डॉक्टर म्हणजे खरेच देवदूत वाटतात...!

डॉक्टर दिन (Inernational Doctor Day)

आज जागतिक डॉक्टर दिन साजरा केला जात आहे. डॉक्टर दिन हा दिवस डॉक्टरांच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. डॉक्टरांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करणे आणि त्यांची कबुली देणे हा या दिवसाचा उद्देश असतो. त्यांनी समाजाप्रती केलेल्या कामाचं कौतुक करण्याचा हा आजचा दिवस आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratalyachi Kheer Recipe: सुट्टीच्या दिवशी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी रताळ्याची खीर

Mumbai Crime : धक्कादायक! मुंबई लोकलमध्ये ट्रान्सजेंडरने नको ते केले, तरुणीच्या अंगाला स्पर्श केला अन्....

Benefits of Good Sleep: कोणत्या वयोगटातील व्यक्तींना किती तासांच्या झोपेची गरज असते? न्यूरोलॉजिस्टने सांगितली परफेक्ट स्लीप गाईड

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Matoshree : मातोश्रीवर नजर ठेवली जातेय, ठाकरेंच्या नेत्यांचा गंभीर आरोप, तो व्हिडिओ केला पोस्ट

SCROLL FOR NEXT