
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वैष्णवांचा मोठा मेळावा पंढरपुरात भरत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुराकडे पायी रवाना झाले आहेत. या भक्तिमय वातावरणात १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी समान वेतन समान काम या तत्त्वावर जुन्या जीर्ण गाड्यांऐवजी नव्या रुग्णवाहिका द्याव्यात. यासह विविध मागण्यांसाठी डॉक्टर व रुग्णवाहिका चालकांचे काम बंद आंदोलन केले आहे.
पाऊस सुरु झाला की वारकऱ्यांना वेध लागतात ते आषाढी एकादशीचे. लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात पायी चालत येतात. भक्तीत तल्लीन असलेल्या वारकऱ्यांना तहान भुकेचा विसर पडतो. वारीमध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतचा समावेश असतो. यांच्या सेवेसाठी पोलिसांसोबत डॉक्टर आणि रुग्णवाहिका तैनात असतात. मात्र समान वेतन समान काम या तत्त्वावर १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांना सेवा सुविधा पुरविण्यात याव्या. यासाठी डॉक्टर आणि रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. हे आंदोलन जुन्या जीर्ण झालेल्या गाड्यांऐवजी नव्या रुग्णवाहिका द्याव्यात. यासह विविध मागण्यांसाठी केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
आषाढीमध्ये पंधरा लाख भाविक येतात. ऐन पालखी सोहळ्याच्या तोंडावर येणाऱ्या भाविकांमध्ये आपात्कालीन व्यवस्थेसाठी रुग्णवाहिकेची गरज असते. मात्र आता १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि चालक संपावर गेले तर प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढणार आहे. तुकाराम महाराजांच्या १८ जून रोजी पालखीचे प्रस्थान देहू येथून सुरु झाले. २७ जून रोजी अकलूज येथे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी मेंढ्यांचे रिंगण घालण्यात आले. २८ जून रोजी महाराजांची पालखी माळशिरस मध्ये दाखल होणार आहे. माळशिरसमध्ये दाखल झालेल्या भाविकांना जेवण आणि आरामाची सोय करण्यात आली आहे.
18 जून – देहू: प्रस्थान समारंभ
19 जून - आकुर्डी: पिंपरी-चिंचवडमधून मिरवणूक
20 जून – पुणे (नानापेठ): सांस्कृतिक स्वागत
21 जून – हडपसर: सामुदायिक कार्यक्रम
22 जून - लोणी काळभोर: भक्ती मेळावे
23 जून – यवत: वाढता सहभाग
24 जून – वरवंड: पारंपारिक प्रार्थना
25 जून - बारामती: भक्तिसंगीत
26 जून – इंदापूर: प्रवचने आणि सादरीकरणे
27 जून - अकलूज: रिंगण विधी साजरा
28 जून – माळशिरस: यात्रेकरूंचे जेवण आणि विश्रांती
29 जून – नाटेपुते: भजन आणि कीर्तन
30 जून – वेळापूर: वैद्यकीय मदत आणि शिबिरे
1 जुलै - पंढरपूर रोड: शेवटचा रस्ता सुरू
2 जुलै – भंडीशेगाव: भक्तीपर कार्यक्रम
3 जुलै – वाखारी: शेवटचा मोठा थांबा
4जुलै – विश्रांती आणि तयारी
5 जुलै - पंढरपूरला आगमन
6 जुलै – आषाढी एकादशी: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.