मुंबई: सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई अग्निशमन दलात (Mumbai Fire Brigade) ९०० फायरमनची कायमस्वरूपी भरती (Recruitment) होणार आहे. या भरतीमध्ये ३०% महिलांना आरक्षण देण्यात आलं आहे. मात्र जर महिला उमेदवार पात्र ठरल्या नाहीत, तर त्याजागी पुरुषांना संधी मिळणार आहे. (Jumbo recruitment will be done in the fire department of Mumbai Municipal Corporation )
हे देखील पहा -
मुंबईच्या (Mumbai) अग्निशमन विभागात सध्या २६०० अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. में ते जून महिन्यादरम्यान या मेगा भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१६ नंतर प्रथमच यंदा अग्निशमन विभागात भरती होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविले जाणार असून, टाटा कंसल्टंटकडून ही परीक्षा घेतली जाईल. पात्र ठरणाऱ्या उमेदवारांमधून मैदानी चाचणीसाठी उमेदवार निवडले जातील. यानंतर मेडिकल चाचणीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांमधून मेरिटवर अंतिम निवड केली जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. अग्निशमन दलाच्या मरोळ, वडाळा, बोरिवली प्रशिक्षण केंद्रांवर हे ट्रेनिंग होईल.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.