भडका! मुंबईत पेट्रोल 84 पैशांनी, तर डिझेल 86 पैशांनी महागले

या वाढीमुळे मुंबई पेट्रोलच्या बाबतीत सर्वात महागडी मेट्रो सिटी ठरली आहे. त्याचबरोबर डिझेलच्या बाबतीत हैदराबाद अव्वल स्थानावर आहे.
Petrol
PetrolSaam Tv

मुंबई - तब्बल 4 महिन्यांनंतर मुंबईत (Mumbai) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्व सामान्य नागरिकांसाठी ही वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. आज मुंबईत पेट्रोल 84 पैशांनी, तर डिझेल 86 पैशांनी महागले आहे. त्यामुळे पेट्रोल हे 110.82 तर डिझेल (Diesel) हे 95 रुपयांना मिळत आहे. या वाढीमुळे मुंबई पेट्रोलच्या बाबतीत सर्वात महागडी मेट्रो सिटी ठरली आहे. त्याचबरोबर डिझेलच्या बाबतीत हैदराबाद अव्वल स्थानावर आहे.

हे देखील पहा -

दररोज या वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्यादरांनी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करत आहे. युक्रेन आणि रशिया मधीलयुद्धाचही परिणाम या दरवाढीवर होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. या वाढत्या महागाईची दखल सरकारने घ्यावी. सरकारने सवलती द्याव्यात अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

4 नोव्हेंबर रोजी शहरात पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होते. 3 नोव्हेंबर रोजी शहरात पेट्रोलचा दर 115.85 रुपये प्रतिलिटर होता. त्याचवेळी डिझेल 106.62 रुपये प्रतिलिटर होते. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात जाहीर केल्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इंधनाचे दर कमी करण्यात आले होते.

Petrol
Jobs In Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात होणार जम्बो भरती...

मंगळवारी मेट्रो शहरांचा विचार करता मुंबईत पेट्रोल सर्वात महाग होते. तर हैदराबादमध्ये डिझेलचा दर 95.50 रुपये प्रतिलिटर होता. मुंबईशिवाय ठाण्यातही इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. येथे पेट्रोल 110.97 रुपये प्रति लीटर तर डिझेल 95.14 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com