प्राची कुलकर्णी, पुणे
पुणे: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात मुंबई आणि पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) आणि तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका (Pune Municiple Corporation) प्रशासन सतर्क झाले आहेत. कोरोनाचा (Corona) सामना करण्यासाठी आता पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटर (Jumbo Covid Center) पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून हे कोव्हिड सेंटर पुन्हा कार्यान्वयीत करण्यात येणार आहे. (Pune Jumbo Covid Center Latest News in Marathi)
हे देखील पहा -
पुण्यामध्ये (Pune) कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिका प्रशाननानेही कंबर कसली आहे. मंगळवारी (४ जानेवारी) पुणे महापालिका हद्दीत ११०४ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पालिकेने ही तयारी सुरु केली आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. तसेच पुण्यातील सार्वजनिक ठिकाणी आता नो मास्क नो एन्ट्री यासह नो व्हॅक्सीन (Vaccine) नो एन्ट्री ही देखील संपल्पना राबवण्यात येत आहे. सोबतच कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.