Mumbai BEST Worker Protest Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai BEST Worker Protest: 'तात्काळ कामावर रुजू व्हा अन्यथा...', संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना कंपनीकडून नोटीस

BEST Worker Protest News: 'तात्काळ नोकरीवर रुजू व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.', असा इशारा कंपनीकडून देण्यात आला आहे.

Priya More

Mumbai News: मुंबईत बेस्टचे कंत्राटी कर्मचारी (BEST contract workers) संपावर गेले आहेत. आज संपाचा सहावा दिवस आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलनासाठी (BEST contract workers Protest) बसले आहेत. संपावर गेलेल्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंपन्यांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. 'तात्काळ नोकरीवर रुजू व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.', असा इशारा कंपनीकडून देण्यात आला आहे.

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता बेस्टला कर्मचारी पुरवठा करणाऱ्या एसएमटी एटीपीएल असोसिएट कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. आपण केलेल्या संपामुळे बेस्ट प्रशासन आणि कंपनीची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे तात्काळ नोकरीवर रुजू व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या ६ दिवसांपासून संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी ते आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. सरकारला मागण्यांबाबत अनेकदा पत्रव्यवहार केल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत असताना कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहत आहेत असे सांगितले आहे.

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ७९६ बस गाडया रस्त्यावर धावल्या नाहीत. आज wet lease च्या एकूण ६०३ बस गाड्या बेस्ट उपक्रमाच्या चालकांकडून प्रवाशांच्या सेवेत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आज MSRTC च्या एकूण 122 बस गाडया बेस्ट उपक्रमाच्या सेवेत असणार आहेत. बस पुरवठादार व्यवसाय संस्थेविरुद्ध कंत्राटीच्या अटी आणि शर्तीप्रमाणे कारवाई करण्याचे आणि कामगारांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले की, 'सरकारने यात हस्तक्षेप करुन तोडगा काढावा. कोणीही मुंबईकरांना वेठीस धरू शकत नाही. अनेक बस गाड्या आज रस्त्यावर नाहीत. याचा त्रास मुंबईकरांना होत आहे.' सरकारने या संपावर ताबडतोब तोडगा काढवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT