‘The Elephant Whisperers’फेम बोमन- बेलीने केले दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘ऑस्करनंतर मेकर्सचं वागणं...’

Bomman and Bellie News: ‘The Elephant Whisperers’ फेम बोमन- बेलीने निर्मात्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत.
The Elephant Whisperers Bomman and Bellie News
The Elephant Whisperers Bomman and Bellie News Saam Tv
Published On

The Elephant Whisperers Bomman and Bellie News: यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला सर्वोत्कृष्ट लघुपट या श्रेणीमध्ये ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या माहितीपटाला पुरस्कार मिळाला होता. सध्या हा ऑस्कर विजेता माहितीपट सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला आहे.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या माहितीपटात बोमन आणि बेली या आदिवासी जोडप्याची संपूर्ण कहाणी दाखवण्यात आली आहे. ऑस्कर पुरस्काराने या जोडीला सन्मानित केल्यानंतर या जोडप्याचे बरीच चर्चा झाली होती.

नुकताच या जोडप्याने निर्मात्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत. काम झाल्यानंतर आमचे पैसे न दिल्याचा आरोप बोमन आणि बेली यांनी निर्मात्यांवर केला आहे. (Tollywood)

The Elephant Whisperers Bomman and Bellie News
Kartik Aaryan On Satyaprem Ki Katha: ‘मला हसवण्यापेक्षा रडवणाऱ्या भूमिका आवडतात...’ कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’बद्दल महत्वाचा खुलासा

एका मुलाखतीत बोमन आणि बेलीने आतापर्यंत पैसे न मिळाल्याचा आरोप केला आहे. या दोघांनीही नुकताच दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस आणि सिख्या एंटरटेनमेंटच्या विरोधात मुलाखत दिली आहे. बोमन आणि बेलीने निर्मात्यांकडे २ कोटी रुपयांची मागणी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीप्रमाणे, “कार्तिकी गोंसाल्विस शुटिंग दरम्यान बोमन आणि बेली यांच्यासोबत खूप चांगल्या पद्धतीने बोलत होती. पण जेव्हा ऑस्कर पुरस्कार मिळाला तेव्हापासून दिग्दर्शकाच्या वागण्यात फार बदल झाला.” (Award)

बोमन आणि बेली पुढे मुलाखतीत म्हणतात, “ऑस्कर मिळाल्यानंतर निर्माते आमच्यासोबत व्यवस्थित बोलत नसायचे, आमच्यापासून दुर राहायला लागले. माहितीपटात जो लग्नाच्या सीनचा खर्च झाला होता, बेलीने तिच्या नातीच्या शिक्षणासाठी ते पैसे जपून ठेवले होते. १ लाख रूपये इतका खर्च त्यांचा शूटिंगमध्ये खर्च झाला होता. कार्तिकीने आम्हाला पैसे परत देईल, अशी हमी देखील दिली होती. पण अजून आम्हाला पैसे मिळालेले नाहीत. आम्ही नेहमी फोन केल्यावर कार्तिकी आमचा फोन कट करून टाकते.” ही बाब त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केली.

The Elephant Whisperers Bomman and Bellie News
Sachin Tendulkar Watch Marathi Movie : 'बाईपण भारी देवा' पाहून क्रिकेटच्या देव देखील भारावला; ट्वीट करत चित्रपटाचे केले कौतुक

बोमन आणि बेली पुढे मुलाखतीत म्हणतात, “फिल्म हिट झाल्यानंतर निर्मात्यांनी आम्हाला चुकीची वागणूक दिली. मुंबईहून कोइंम्बतूरला जात असताना आमच्याकडे घरी जाण्यासाठी ही पैसे नव्हते. आम्हाला निर्मात्यांनी साधी मदत देखील केली नव्हती. गोन्साल्व्हिसने सांगितले होते की, तिने पैसे परत केले. पण आमच्या बँक अकाऊंटमध्ये केवळ ६० रुपयेच होते. तमिळनाडूमधील नीलगिरीमध्ये थेप्पाकाडु हाथी शिबिरात बोमन आणि बेली अनाथ हत्तींची काळजी घेतात. माहितीपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर राज्य सरकारने (तामिळनाडू सरकार) त्यांना घर आणि १ लाख रुपये बक्षिस अशी घोषणा केली होती. मात्र कार्तिकने ती रक्कम स्वत:कडेच ठेवली.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com