Kartik Aaryan On Satyaprem Ki Katha
Kartik Aaryan On Satyaprem Ki KathaSaam Tv

Kartik Aaryan On Satyaprem Ki Katha: ‘मला हसवण्यापेक्षा रडवणाऱ्या भूमिका आवडतात...’ कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’बद्दल महत्वाचा खुलासा

Kartik Aaryan News: एका मुलाखतीत कार्तिक आर्यनने ‘सत्यप्रेम की कथा’ मधील त्याच्या भूमिकेबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
Published on

Kartik Aaryan On Satyaprem Ki Katha: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण ८३.८५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने केलेली कमाई पाहता चित्रपटातील सर्वच कलाकार आनंदित आहे.

कार्तिक आर्यन सध्या ‘चंदू चॅम्पियन’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकतंच अभिनेत्याने एका मुलाखतीत ‘सत्यप्रेम की कथा’ मधील त्याच्या भूमिकेबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. मला प्रेक्षकांना हसवण्यापेक्षा रडवायला आवडतं. अशी प्रतिक्रिया त्याने मुलाखतीत दिली आहे.

Kartik Aaryan On Satyaprem Ki Katha
Sachin Tendulkar Watch Marathi Movie : 'बाईपण भारी देवा' पाहून क्रिकेटच्या देव देखील भारावला; ट्वीट करत चित्रपटाचे केले कौतुक

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या ‘चंदू चॅम्पियन’ मधील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले, तो म्हणतो “चित्रपटात तुम्हाला माझ्या वजनात खूप बदल झालेला दिसेल. चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी मी २ महिन्यात माझ्या वजनात वाढ केली ​​आहे. चित्रपटाची शूटिंग लंडनमध्ये सुरू होती. लंडनमध्ये मला खूपच ताप आला होता. अंगामध्ये ताप असतानाही मी थंड पाण्यात शूट केले होते. शूटिंगपूर्वी मी गोळ्याही खालल्या होत्या.” अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने दिली.

सोबतच पुढे अभिनेत्याने मुलाखतीत ‘सत्यप्रेम की कथा’ मधील भूमिकेबद्दल सांगितले, तो म्हणतो, “मला चित्रपटात प्रेक्षकांना हसवण्यापेक्षा रडवायला जास्त आवडते. जर तुम्ही ‘सोनू के टीटू की स्वीटी’ चित्रपट पाहिला असेल तर पहिल्या ३०- ४० मिनिटे निव्वळ ड्रामाच आपल्याला दिसतो. ज्यामध्ये प्रेक्षकांना चित्रपटाची कथा मैत्रीसाठी सर्वांनाच रडवते. चित्रपटाच्या कथेत सर्वच धाटणीचा थोडा थोडा सार असल्याने प्रेक्षकांना चित्रपट फारच भावला होता.” (Bollywood Film)

Kartik Aaryan On Satyaprem Ki Katha
Jackie Shroff On Rajinikanth : रजनीकांत मला सॉरी म्हणाले, जॅकी श्रॉफने सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा

“चित्रपटात प्रेक्षकांचे इमोशन्स आणि ड्रामाकडे जितके लक्ष जाते, तेवढे कॉमेडीकडे लक्ष जात नाही. ‘लुका छुपी’मध्येही असंच काहीसे घडले, चित्रपटात कॉमेडीने काही भावनिक दृश्यांवरही वर्चस्व गाजवले, पण 'सत्य प्रेम की कथा'च्या बाबतीत असे घडले नाही.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली. (Entertainment News)

Kartik Aaryan On Satyaprem Ki Katha
Taali New Video: नवा लूक, दमदार संवाद; सुष्मिता सेनने शेअर 'ताली'चा नवीन व्हिडिओ

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘चंदू चॅम्पियन’ सोबतच कार्तिक आर्यनकडे ‘आशिकी 3’ आणि ‘भूल भुलैया ३’ सह अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com