Sachin Tendulkar Watch Marathi Movie : 'बाईपण भारी देवा' पाहून क्रिकेटच्या देव देखील भारावला; ट्वीट करत चित्रपटाचे केले कौतुक

Baipan Bhari Deva: 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Sachin Tendulkar Watch Baipan Bhari Deva
Sachin Tendulkar Watch Baipan Bhari DevaTwitter @sachin_rt

Sachin Tendulkar Review Baipan Bhari Deva : 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने रसिकप्रेक्षकांच्या मनात विशिष्ट्य जागा निर्माण केली आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांच्या बरोबरीने उभा आहे. या चित्रपटाने वेड, सैराटसारख्या मराठी चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे.

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या चित्रपटाची भुरळ सेलिब्रिटींना देखील पडली आहे. क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकरने त्याच्या पत्नीसह या चित्रपटाच पहिला. त्याने चित्रपटाचेकौतुक तर केले. त्यासह चित्रपटाच्या कास्टची भेटही घेतली.

Sachin Tendulkar Watch Baipan Bhari Deva
Jackie Shroff On Rajinikanth : रजनीकांत मला सॉरी म्हणाले, जॅकी श्रॉफने सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा

'बाईपण भारी देवा'विषयी ट्विट करत सचिन म्हणाला, 'आपण एकेमेकांच्या अजून जवळ येण्यासाठी वेगळे होतो, 'बाईपण भारी देवा' ही ६ बहिणींची एक हृदयाला भिडणारी कथा आहे. हा मराठी चित्रपट पाहताना मला खूप आनंद झाला आणि माझी आई आणि मावशी कधी एकदा हा चित्रपट पाहतायत असं मला झालं आहे. तसेच या चित्रपटाच्या कास्टला भेटणे माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता.'

'बाईपण भारी देवा' चित्रपट पाहायला क्रिकेटचा देव आला आहे हे केदार शिंदे यांनी पोस्ट करत सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, 'जेव्हा क्रिकेटचा "देव"... "बाईपण भारी देवा" सिनेमा पाहातो... श्री स्वामी समर्थ महाराज की जय.' केदार शिंदे यांच्या पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रिटी कमेंट करत आहेत.

दिपा सावंत चौधरी म्हणजे चित्रपटामध्ये सर्वात लहान बहिणीची भूमिका साकारणारी चारू यावेळी उपस्थित राहू शकली नाही. तर तिच्याशी सचिनने व्हिडीओ कॉलवर संवाद साधला.

सचिन तिला म्हणाला,"अभिनंदन, मला चित्रपट खरंच खूप आवडला. आपण भेटूया. मी अजितला सांगेन. मी त्याला सांगेन. बाजूलाच आहे तो माझ्या. All The Best" असं म्हणत सचिनने दीपाचं कौतुक केलं. दीपाला खुप आनंद झाला होता. ती व्हिडीओ कॉलवर सचिनचे आभार मानत होती.

'बाईपण भारी देवा' हा चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून सहा बहिणींची कथा सांगण्यात आली आहे. हा चित्रपटादरम्यान केदार शिंदे यांचा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर हा चित्रपट साकार झाला.

रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा सावंत या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com