JOGESHWARI POLICE CRACKDOWN: HABITUAL OFFENDERS ARRESTED, SIX CRIMES SOLVED 
मुंबई/पुणे

Jogeshwari Crime: जोगेश्वरी पोलीसांची मोठी कामगिरी; सराईत आरोपींना अटक, सहा गुन्हे उघडकीस

Mumbai Police Achievement: जोगेश्वरी पोलीसांनी मोठी कामगिरी केली असून सराईत आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. या कारवाईत सहा गुन्ह्यांचा छडा लागला आहे.

Dhanshri Shintre

संजय गडदे | साम टीव्ही न्यूज

जोगेश्वरी(Jogeshwari) पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बतावणी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून अंदाजे ३.४० लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईत आरोपींकडून इतर सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

१६ सप्टेंबर रोजी ७० वर्षीय किस्तुरा चौधरी यांना जोगेश्वरी रेल्वे स्टेशन परिसरात फसवून दोन सोन्याच्या अंगठ्या चोरून नेण्यात आल्या होत्या. सीसीटीव्ही तपासणी व तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे आणि मुंढवा परिसरातून रमेश विजयकुमार जैस्वाल (४६) व निलेश चंद्रकांत घाग (३३) यांना अटक करण्यात आली.

आरोपी रमेश जैस्वाल याच्याविरोधात मुंबई, ठाणे व मिरा-भाईंदर परिसरात तब्बल ८१ गुन्हे दाखल असून, निलेश घागवर पाच गुन्हे नोंद आहेत. वाकोला, बोरीवली, कल्याण व डोंबिवलीसह सहा गुन्ह्यांतील दागिने व पुरावे या आरोपींकडून हस्तगत झाले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर आयुक्त परमजित सिंग दहिया यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सपोनि सुदर्शन पाटील, सपोनि विनोद लाड, सपोनि नागेश मिसाळ व पथकाने तपास करून आरोपींना गजाआड केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

लग्नाआधी वजन कमी करायचंय? मुलींनी नक्की फॉलो कराव्यात ‘या’ 5 टिप्स

Liver disease symptoms: रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी अचानक ही 3 लक्षणं दिसली समजा लिव्हर खराब होतंय

SCROLL FOR NEXT