Jitendra Awad's objectionable statement
Jitendra Awad's objectionable statement saam tv
मुंबई/पुणे

Jitendra Awhad News: जितेंद्र आव्हाडांविरोधात सिंधी समाज आक्रमक! आमदारकी रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Jitendra Awad's Offensive statements about Sindhi community: माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी ठाण्याच्या कोपरी भागात सिंधी समाजाने आक्रमक होत मेळावा घेतला आणि आव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला.

एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे असंसदीय शब्दांचा वापर करणाऱ्या आव्हाडांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याची भूमिका देखील समाजाने घेतली आहे.

उल्हासनगर प्रभात गार्डन कॅम्प-5 जवळ २७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांची जीभ घसरली. आव्हाड यांनी यावेळी बोलताना सिंधी समाजाला कुत्र्यांची उपमा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर सिंधी समाज आक्रमक झाला आहे. बुधवारी कोपरीतील सिंधी समाजाने एकत्र येत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाण्याच्या कोपरी परिसरात मोठ्या संख्येने सिंधी बांधव वास्तव्याला आहेत. येथील सिंधी बांधवांनी कोपरीतील शंकर मंदिरात एकत्र येत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला. तसेच जोपर्यंत जितेंद्र आव्हाड माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या घरावर मोर्चा काढणे, कोपरी बंद ठेवणे, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देणे या संविधानिक मार्गाने निषेध नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला. (Latest Political News)

यावेळी शिवसेनेचे प्रकाश कोटवानी, गोपाळ लांडगे, हेमंत पमनानी, दिपक घनशानी यांच्यासह कोपरीतील सिंधी समाज तसेच इतर समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीनंतर गोपाळ लांडगे आणि सिंधी समाजातील कोटवानी व घनशानी यांनी आव्हांडांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Technology Tips: एसीची कूलिंग घरबसल्या वाढवायची आहे? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

Raigad News: अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला प्रकरण, भरत गोगावलेंच्या मुलासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Life Success Tips : शहाणे असाल तर आयुष्यातील 'या' गोष्टी कधीच कुणालाही सांगू नका, अन्यथा पश्चाताप होईल

Baramati Lok Sabha Election: बारामती लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 228 मतदारांनी बजावला हक्क

Relation Tips: नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी करा 'या' नियमांचे पालन

SCROLL FOR NEXT