Amol Kolhe On Gautami Patil
Amol Kolhe On Gautami Patilsaam tv

Gautami Patil News: गौतमी पाटील घेणार राजकारणात एन्ट्री? डॉ. अमोल कोल्हेंनी दिला मोलाचा सल्ला

Gautami Patil Entry In Politics: गौतमीच्या प्रसिद्धीची चर्चा राजकीय वर्तुळात देखील आहे. अनेक राजकीय नेत्यांनी गौतमीबाबत आणि तिच्या कार्यक्रमांबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
Published on

>>रोहिदास गाडगे, साम टीव्ही

Amol Kolhe On Gautami Patil: राज्यातील कला क्षेत्रात गेल्या काही काळापासून एक नाव प्रचंड गाजतयं. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्याच तोंडावर जे नाव आहे ते म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटील सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. जिथे तिचा कार्यक्रम होतो तिथे प्रचंड जनसमुदाय जमतोय. हजारोंच्या संख्येने लोक गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम पाहायला जातात. त्यामुळे एवढी प्रसिद्धी मिळाल्यानतंर आता गौतमीच्या राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

स्वत: गौतमीने आपण सध्या आपल्याच क्षेत्रात काम करत राहणार असून राजकारणात येण्याचा कोणाताही विचार नसल्याचे म्हटले आहे. परंतु गौतमीच्या प्रसिद्धीची चर्चा राजकीय वर्तुळात देखील आहे. अनेक राजकीय नेत्यांनी गौतमीबाबत आणि तिच्या कार्यक्रमांबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यामुळे गौतमी राजकारणात येणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी देखील गौतमीच्या राजकारणात प्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Amol Kolhe On Gautami Patil
Raj Thackeray's Letter to PM Modi: कुस्तीपटूंची तशी फरफट पुन्हा होऊ देऊ नका... राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना रोखठोक पत्र

"कला क्षेत्रातली प्रसिद्धी आळवावरचं पाणी"

गौतमीच्या राजकारणात प्रवेशाबाबत बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, कलाकाराने राजकारणात का आणि कशासाठी यावं याचा प्रथम खुलासा करायला हवा. गौतमी पाटील कमी वयात प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. कला क्षेत्रातली प्रसिद्धी आळवावरचं पाणी असतं, त्यामुळे कमी वयात प्रसिद्धी मिळाली तरी कलाकाराने एका शाश्वत करिअरकडे आखाणी करायला हवी, असेही ते म्हणाले. (Breaking News)

Amol Kolhe On Gautami Patil
Mumbai News: जे.जे. रुग्णालयातील नेत्रतज्ञ्ज डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे; नेमकं काय घडलं?

'करियर निवडताना आपण ते का निवडतोय हे माहिती असावं'

पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, कलाकाराचे राजकारणात स्वागत आहे. परंतु कलाकाराने राजकारणात येत असताना आपल्या लोकप्रियतेचा फायदा समाजाला फायदा होणार आहे का? की केवळ आवड आहे म्हणून येत आहोत याचं उत्तर शोधायला हवं. कोणतही करियर निवडताना आपण ते का निवडतोय याचं उत्तर आपल्या मनात स्पष्ट असायला हवं असं भाष्य डॉ. अमोल कोल्हे यांनी गौतमीच्या राजकारणातल्या एंट्रीवर केले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com