Nashik Hirkani News: तान्हुल्यासाठी आईने घेतली बाल्कनीतून उडी! शिरपूरच्या आधुनिक हिरकणीची थक्क करणारी गोष्ट

Mother jumped from balcony for baby: नाशिकमध्ये तृप्ती जगदाळे सोनार या माहिलेने तिच्या बाळासाठी केलेल्या धाडसाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
Mother jumped from balcony for baby
Mother jumped from balcony for babysaam tv

Mother risked her life for baby stuck in house: कचरा टाकण्यासाठी आई घराबाहेर गेली आणि हवेच्या दाबाने दरवाजा लॉक होऊन घरात दीड वर्षांचं बाळ कोंडलं गेलं. यानंतर आईने जिवाची पर्वा न करता चक्क एका बाल्कनीतून दुसऱ्या बाल्कनीत उडी घेतली आणि घरात कोंडलेल्या बाळाला कवेत घेतलं. नाशिकमध्ये तृप्ती जगदाळे सोनार या माहिलेने तिच्या बाळासाठी केलेल्या धाडसाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

हिरकणीच्या धाडसाची आणि मातृ प्रेमाची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. सर्वांनी शालेय जीवनात हिरकणीची कथा तुम्ही ऐकलेलीच असेल. मात्र नाशिकमध्ये एका मातेने दाखवलेल्या धाडसाने तुम्हाला या कथेची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

Mother jumped from balcony for baby
#shorts : Gautami Patil लवकरच राजकारणात येणार? यावर Amol Kolhe काय म्हणाले?

नाशिकच्या तृप्ती जगदाळे ही महिला रोजचा दिनक्रमानुसार काम करत होती. घरात दीड वर्षांचं बाळ खेळण्यात रमलेलं होतं. याच वेळी कचरा टाकण्यासाठी म्हणून तृप्ती घराबाहेर गेल्या आणि तेवढ्यात जोरात आलेल्या वाऱ्याच्या दाबाने घराचा दरवाजा लॉक झाला. दार जोरात लागल्याने घाबलेल्या बाळ घरात रडू लागलं.

घरातून बाळाचा रडण्याचा आवाज येत असल्याने प्रचंड काळजीत असलेल्या आईला काय करावं काही कळेना. या विवंचनेत सापडलेल्या तृप्तीने थेट बाजूच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्या घरातील 4 फूट गलरीतून पाईपच्या सहाय्याने आपल्या घराच्या गॅलरीत उडी घेतली आणि धावत जाऊन बाळाला कवेत घेऊन हंबरडा फोडला. (Breaking News)

Mother jumped from balcony for baby
350th Shivrajyabhishek Sohala: रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात होणार साजरा

बाळासाठी जीव धोक्यात घालून एका घराच्या बाल्कनीतून दुसऱ्या घराच्या बाल्कनीत उडी घेणाऱ्या या आधुनिक हिरकणीचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. मुळच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील असलेलल्या आणि सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या तृप्ती जगदाळे सोनार यांनी केलेल्या या धाडसाची संपूर्ण नाशिकमध्ये चर्चा आहे. दीड महिन्याच्या बाळासाठी त्यांनी जे केलं त्यामुळं त्यांना आधुनिक हिरकरणी म्हटलं जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com