Jitendra Awhad X
मुंबई/पुणे

येऊर हिल्समध्ये ५०० रुपये देऊन बलात्काराचा परवाना मिळतो, जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा

Jitendra Awhad News : ठाण्यातील येऊर हिल्स येथे ५०० रुपये देऊन बलात्काराचा परवाना मिळतो असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यांची एक्स पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Yash Shirke

ठाण्यातील येऊर हिल्समधील दोन बंगल्यांमध्ये दोन बलात्कार झाले आहेत. दोन्ही बंगले बेकायदेशीररित्या बांधण्यात आले आहेत. या परिसरात अनेक गैरप्रकार घडत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. येऊर हिल्सच्या मुख्य प्रवेशद्वारावर ५०० रुपये देऊन बलात्काराचा परवाना मिळतो असा खळबळजनक दावा आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करत बेकायदेशीर बांधकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

'ठाण्यातील येऊर हिल्स संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. येथील मुख्य प्रवेशद्वारावर ५०० रुपयांत बलात्कार करण्याची परवानगी दिली जात आहे. वर्तक नगर पोलीस स्थानकामध्ये २४ तासांत दोन गंभीर प्रकरणांवर एफआयआर दाखल झाल्यानंतर येऊर परिसरावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.'

'येऊर हिल्स परिसरातील हँगआउट बंगला २५ तरुणांना भाड्यासाठी देण्यात आला होता. या तरुणांनी पार्टीसाठी बंगला बुक केला असल्याची माहिती समोर आली. या २५ तरुणांसह १६-१७ वर्षांच्या १० अल्पवयीन मुली होत्या. हिल टॉप व्हिला बंगल्यावर सामूहिक बलात्कार आणि विनयभंग झाल्याची नोंद वर्तक नगर पोलीस स्थानकात आहे. रात्री ११ पर्यंत सुविधा सुरु ठेवण्याची परवागनी उच्च न्यायालयाने फक्त २ हॉटेल्सना दिली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पोलीस आणि वन अधिकाऱ्यांनीही उल्लंघन केले आहे' अशी एक्स पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर येथे काही वर्षांपासून बेकायदेशीर बांधकामे उभी करण्यात आली आहे. तेथील वनक्षेत्रांमध्ये अनेकदा रात्रीच्या वेळेस पार्ट्या केल्या जातात. तेथे काही दिवसांपूर्वी बलात्काराची घटना घडली होती. बलात्काराच्या घटनेनंतर पुन्हा येऊरमध्ये पार्ट्या झाल्या. जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रकरण लावून धरले. आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाडने पर्यावरणवादी कार्यकर्त्यांसह येऊनच्या उपवन येथील प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT