jet airways founder naresh goyal Arrested by ed on canara bank fraud case  Saam TV
मुंबई/पुणे

Naresh Goyal Arrested: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक; कॅनरा बँक फसवणूक प्रकरणात ईडीची कारवाई

Naresh Goyal Arrested News: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीने अटक केल्याची माहिती आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गोयल यांना अटक करण्यात आली आहे.

Satish Daud

Naresh Goyal Arrested News: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीने अटक केल्याची माहिती आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गोयल यांना अटक करण्यात आली आहे. कॅनरा बँकेची तब्बल ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीकडून शुक्रवारी गोयल यांची चौकशी करण्यात आली. दिवसभर झालेल्या चौकशीनंतर ईडीने त्यांना शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं यांसदर्भातील माहिती दिली आहे. गोयल यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट, गुन्हेगारी विश्वासाचा भंग आणि गुन्हेगारी गैरवर्तनाचा आरोप करण्यात आले आहेत. ५३८ कोटी रुपयांचं हे प्रकरण कॅनरा बँकेशी निगडीत आहे. (Latest Marathi News)

कॅनरा बँकेच्या आरोपानुसार, त्यांनी जेट एअरवेज लिमिटेडला ८४८.८६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते, त्यापैकी ५३८.६२ कोटी रुपये थकित आहेत. त्यानुसार कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून तपास यंत्रणेने नवीन गुन्हा दाखल केला आहे. यानंतर बंद पडलेल्या जेट एअरवेजचे प्रवर्तक नरेश गोयल यांच्यावर ईडीने कारवाईला सुरुवात केली.

नरेश गोयल आणि इतरांविरुद्ध ईडीने (ED) फसवणुकीचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच गोयलच्या मुंबई आणि दिल्लीतील आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. सीबीआयने आपल्या तपासात गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि जेट एअरवेजचे माजी संचालक गौरांग आनंद शेट्टी यांना आरोपी केले.

दरम्यान, कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून ईडीने गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल, आनंद शेट्टी आणि जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (जेआयएल) यांच्याविरुद्ध 538 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गोयल आणि जेट एअरवेजच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते.

शुक्रवारी गोयल यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले. दिवसभर ईडी कार्यालयात त्यांची कसून चौकशी करण्यात आली. दिवसभर झालेल्या चौकशीनंतर ईडीने रात्री उशिरा गोयल यांना अटक केली आहे. दरम्यान, अटकेनंतर आज गोयल यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT