Jayant Patil News Saam tv
मुंबई/पुणे

Jayant Patil News: BMCने भूखंड-उद्याने दत्तक देण्याचं धोरण रद्द करावं; जयंत पाटील यांची मागणी

Jayant Patil News: महापालिकेने हे धोरण रद्द करण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांनी केली आहे.

Vishal Gangurde

रुपाली बडवे

Jayant Patil News:

मुंबई महापालिका प्रशासन पुन्हा एकदा शहरातील मनोरंजन मैदाने आणि क्रिडांगणे दत्तक तत्वावर देण्याबाबत धोरण आणत आहेत. महापालिकेने हे धोरण रद्द करण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. (Latest Marathi News)

जयंत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, 'मैदाने व क्रीडांगणे यांची देखभाल पालिकेला परवडत नसल्यामुळे या मोकळ्या जागा दत्तक तत्त्वावर देण्याचा विचार पालिका करत आहे. पालिकेच्या या धोरणावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या होत्या'.

मुंबई दाट लोकवस्तीचं शहर आहे. त्यामुळे मनोरंज आणि आरोग्यासाठी सार्वजनिक मोकळ्या जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. याआधी देखील पालिका प्रशासनाने काही व्यक्तींना भूखंड दत्तक दिले होते. मात्र त्या जागांवर त्यांनी व्यायामशाळा व इतर बांधकामे करून अतिक्रमण केल्याची बाब जयंत पाटील यांनी या पत्रात नमूद केली आहे .

जयंत पाटील पुढे म्हणाले की,' काही मोकळ्या जागी सामान्य नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. तसेच पालिकेला दत्तक दिलेले काही भूखंड परत घेणे अद्यापही शक्य झालेलं नाही. यामुळे पालिकेचे भुखंड खासगी लोकांना दत्तक देण्याची धोरण आखण्याचे कारण समजून येत नाही'.

'पालिकेने वार्षिक ५२ हजार कोटी रुपये अंदाजपत्रक आणि महानगरपालिकेला स्वतःच्या उद्याने व भूखंडाची देखभाल करणे शक्य होत नसल्याची बाब ही भूषणावह नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी पालिकेचे कान टोचले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सेक्सटॉर्शन, डिजिटल अरेस्ट.. मुंबईकरांनी १५ महिन्यात गमावले ११२७ कोटी रूपये

Tax Saving Tips : करदात्यांच्या कामाची बातमी! टॅक्स वाचवण्याचे ५ मार्ग, ITR फाइल करण्याआधी नोट करा

HBD Sonu Nigam : लग्जरी गाड्यांचा शौकीन सोनू निगम कोट्यावधींचा मालक

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे पोलिस आयुक्तलयात जाणार

Sanjay Raut : 'ED धाडीचे धागेदोरे भुसेंपर्यंत जाऊ शकतात' संजय राऊत यांचा भुसेंवर हल्लाबोल | VIDEO

SCROLL FOR NEXT