Shiv Swarajya Yatra Pune: Saam Digital
मुंबई/पुणे

Jayant Patil: आमचाच मुख्यमंत्री व्हावा ही लोकांची भावना; जयंत पाटलांच्या विधानाने मविआत अस्वस्थता?

Jayant Patil On CM Post: शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरुन मोठं विधान केलंय. त्यांच्या विधानामुळे मविआत वाद होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

राज्यातील विधानसभा निवडणूक मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर चर्चेत आलीय. महायुती आणि महाविकास आघाडीत सीएमच्या उमेदवारांवरून वाद होण्याची शक्यता आहे. एकीकडे ठाकरे गट मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असतानाच जयंत पाटील यांनी सीएम संदर्भात मोठं विधान केलंय. जयंत पाटलांच्या विधानामुळे मविआत अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी एकसंध राहायला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. पण आमचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटतंय हे खरं आहे, असं विधान जयंत पाटील यांनी केलंय. ते पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित 'महाराष्ट्र व्हिजन 2050' कार्यक्रमात बोलत होते. मात्र त्यांच्या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शरद पवार यांची भूमिका नेहमीच त्यागाची राहिलीय, असं जयंत पाटील म्हणालेत. जयंत पाटील यांच्या विधानातून त्यांनी त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवलीय. याचबरोबर त्यांनी सांगली मधील महाविकास आघाडीमधील वादावर भाष्य केलं. सांगलीचा विषयावर पांघरून पडलेलं आहे. ते आता काढण्याची गरज नाही. सांगलीतील दोन्ही तरुण मुलं चांगली आहेत. त्यांच्या वडिलांबरोबर मी काम केलेलं आहे.

मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्यावेळी गैरसमज झाले होते. आता दुरुस्ती झालेली आहे. ⁠सांगलीत कोणी कुणाचा कार्यक्रम केला नाही. परिस्थितीच तशी निर्माण झाली.⁠पक्ष कसा चालला पाहिजे याचा सर्वात जास्त अनुभव मला आले. माझे दिवस मोजणाऱ्याना ते कळून चुकलं आहे.

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा केली जावी, अशी मागणी केली जातेय. उद्धव ठाकरेसुद्धा मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. याबाबत संजय राऊत अनेकवेळा भाष्य केले होतं. तर काँग्रेसकडूनही नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत आहे.

मुख्यमंत्रीपदावर काय म्हणाले शरद पवार

आता शरद पवारांनी जे काही असेल ते निवडणुकीनंतर होईल, असे स्पष्ट संकेत दिलेत. मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रीपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीननंतर कोण मुख्यमंत्री होणार हे ठरणार आहे असं शरद पवार यांनी कोल्हापुरात म्हटलं होतं.

काय म्हणाले मुनगंटीवार

जयंत पाटील यांनी आपली इच्छा बोलून दाखवलीय. महाविकास आघाडीमध्ये सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना मुख्यमंत्री होऊ वाटते. त्यामुळे जयंत पाटील यांनी आपली इच्छा बोलून दाखवली तर त्यात काही चुकीचं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT