Jayant Patil Vs Tanaji Sawant Saam TV
मुंबई/पुणे

मराठा समाजाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर जयंत पाटलांची सडकून टीका; म्हणाले, मस्ती वाढली...

न्यायालयामध्ये आमदारांना निलंबित केले तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात - पाटील

गोपाल मोटघरे

पुणे: आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या तोंडून फडणवीस बोलतायत म्हणून ते असं वक्तव्य करू शकतात, थोडक्यात काय तर सत्तेची मस्ती वाढली आहे, अशी घणाघाती टीका करत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) केली आहे.

एकनाथ शिंदे सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा (Maratha Reservation) समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात त्यांचा निषेध केला जात आहे. या वक्तव्याबाबत तानाजी सावंतांनी माफी मागितली असली तरिही त्यांच्या हकालपट्टीची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सावंतांवर सडकून टीका केली, तानाजी सावंतांच्या तोंडून फडणवीस बोलतायत म्हणून ते असं वक्तव्य करू शकतात, थोडक्यात काय तर त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. अशी टीका पाटील यांनी केली.

पाहा व्हिडीओ -

पाटील यांनी यावेळी राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. राज्य सरकार घाबरतय म्हणून महापालिकेच्या निवडणूका पुढे ढकलतायत. देशात न्याय जिवंत असेल तर उद्या होणाऱ्या सुनावणीमध्ये आमचा विजय होईल. शिवाय न्यायालयामध्ये आमदारांना निलंबित केले तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता देखील वर्तवली आहे.

केंद्र सरकारला सीबीआय आणि न्यायालय या शिवाय दुसर काही सुचत नाही, तपास यंत्रणांकडून पीएफआय बद्दल माहिती अपेक्षित होती, त्यावर वेळीच कारवाई अपेक्षित होती पण केंद्र सरकरचे नियंत्रण नसल्यामुळे पाकिस्तान जिंदाबाद घोषणा द्यायला हे धजावले असंही ते म्हणाले.

तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना मंत्रिपद का मिळाले नाही ते पाहावे, अजित पवारांची काळजी करू नये, अजितदादा आमच्याशी बोलणार की त्यांच्याशी असा टोला ही त्यांनी बावनकुळेंना यावेळी लगावला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader Threat : भाजप नेत्यापासून मला आणि माझ्या आईचा जीवाला धोका; अभिनेत्रीने रडत रडत केली पोलिसांची पोलखोल

Maharashtra Live News Update : सिंहगडावर दोन दिवसांत १५ हजारांपेक्षा जास्त पर्यटकांची गर्दी

Flood Viral Video: डोक्यावर बाळ अन् मागे बायको; पुरातून वाट काढत जाणाऱ्या बापाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ

Actress File Cyber Case: ७ महिन्यांच्या मुलाविरोधात निगेटिव्ह कमेंट्स; 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री संतापली, थेट पोलिसात केली तक्रार दाखल

Bel Leaves: महादेवाला बेलाची पान का वाहतात?

SCROLL FOR NEXT