BJP Leader Threat : भाजप नेत्यापासून मला आणि माझ्या आईच्या जीवाला धोका; अभिनेत्रीने रडत रडत केली पोलिसांची पोलखोल

actress Kristina Patel : अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत भाजप नेत्यावर गंभीर आरोप केले. तसेच तिने रडत रडत पोलिसांची पोलखोल केली.
actress Kristina Patel News
actress Kristina Patel Saam tv
Published On

Kristina Patel : अभिनेत्री आणि मॉडेल क्रिस्टीना पटेलने भाजप नेता आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मूळची गुजरातच्या राजकोटची आणि आता मुंबईत राहणाऱ्या क्रिस्टिना पटेलने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. 'माझ्या आईच्या जीवाला धोका आहे. पोलीस तक्रार नोंदवून घेत नाही. माझ्या वडिलांचे मोठे भाऊ दादागिरी करत आहे. त्यांनी संपत्तीच्या वादातून घरात घुसून हल्ला केला. मला आणि माझ्या आईला त्रास दिला, असं म्हणत तिने पोलिसांवर गंभीर आरोप केले.

actress Kristina Patel News
Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

मुंबईत राहणारी क्रिस्टिना पटेलने व्हिडिओमध्ये म्हटलं की, वडिलांच्या निधनानंतर आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आमच्या नातेवाईकांनी संपत्ती हडप केली. यासाठी कायदेशीर मार्गाने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मी मुंबईत राहत आहे. तर माझी आई एकटी राजकोटमध्ये राहते'.

'माझे काका बिपीन अमृतिया, चुलत भाऊ आनंद अमृतिया आणि अज्ञात व्यक्तीने घरात घुसून आईवर हल्ला केला. पोलिसांना सांगूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. तसेच पोलिसांनी तक्रार देखील नोंदवून घेतली नाही, असे अभिनेत्रीने सांगितलं.

actress Kristina Patel News
Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीची गायब तलवार सापडली; महिनाभरापासून गायब होती तलवार, वाचा स्पेशल रिपोर्ट

क्रिस्टिनाने पुढे सांगितलं की, 'पोलिस आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. माझे चुलते भाजपच्या मोठ्या पदावर आहेत. ते राजकारणात आहेत, याचा अर्थ ते कोणाचीही हत्या करू शकतात का? माझ्या आईला काय झालं? तर मी काय करू? एखाद्याच्या जीवाला धोका असेल, तरी पोलीस तक्रार नोंदवून का घेत नाहीत? ते भाजपमध्ये असल्याने तक्रार नोंदवली जात नाही का? मला काहीच कळत नाहीये की, मी काय करू? मी मुंबईत असून आई राजकोटमध्ये एकटी आहे. माझी गुजरात पोलिसांना विनंती आहे की, त्यांनी कारवाई करावी आणि माझ्या आईला सुरक्षा पुरवावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com