Actress File Cyber Case
Actress File Cyber CaseSaam Tv

Actress File Cyber Case: ७ महिन्यांच्या मुलाविरोधात निगेटिव्ह कमेंट्स; 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री संतापली, थेट पोलिसात केली तक्रार दाखल

Actress File Cyber Case: 'लाफ्टर शेफ्स २' फेम देवोलिना भट्टाचार्यच्या ७ महिन्यांचा मुलगा जॉय सोशल मीडियावर ट्रोल झाला, ज्यामुळे अभिनेत्री दुखावली आणि तिने सायबर क्राइममध्ये गुन्हा दाखल केला.
Published on

Actress File Cyber Case: 'लाफ्टर शेफ्स २' मध्ये नुकतीच दिसलेली देवोलीना भट्टाचार्य तिच्या लहान मुलाबद्दल लोकांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागतं आहे. तिने सांगितले की तिचा मुलगा जोयला कृष्णवर्णीय असल्याचे इंस्टाग्रामवर ट्रोल केलं जातं आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर निगेटिव्ह कमेंट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत आणि सायबर क्राइमचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली आहे. देवोलीना म्हणाली की तिच्या मुलाबद्दल दोन हजारांहून अधिक निगेटिव्ह कमेंट्स आल्या आहेत.

देवोलीना भट्टाचार्यने सायबर क्राइम इंडियाच्या अधिकृत अकाउंटला देखील हा प्रकार शेअर केले आणि त्यांच्याकडून पाठिंबा मागितला. याशिवाय, तिने तिच्या पेजवर या कमेंट्स करणाऱ्या लोकांशी चॅट देखील पोस्ट केला.

Actress File Cyber Case
Casting Couch: 'मला बेशुद्ध करुन...',१६ व्या वर्षात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडली कास्टिंग काउचसारखी थरारक घटना, म्हणाली...

देवोलीना भट्टाचार्यने सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल केला

तिच्या एका पोस्टमध्ये असे लिहिले होते, 'आता मी काय बोलावे. ८९००+ कमेंट्स. जरी मी यापैकी २००० नकारात्मक मानल्या तरी ७ हजार सकारात्मक कमेंट्स आहेत. माझ्या मुलासाठी प्रेम, प्रार्थना, आशीर्वाद आणि संरक्षणाबद्दल सर्वांचे आभार. तसेच, सर्व मातांना एक विनंती आहे नेहमी ट्रोलविरुद्ध उभे राहा, विशेषतः जेव्हा तुमच्या मुलाचा प्रश्न येतो तेव्हा. पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे आभार आणि @indiancyberpolice चे विशेष आभार.'

Actress File Cyber Case
Sakhubai Song: सबसे कातिल गौतमी पाटील थिरकणार सिद्धार्थ जाधवसोबत; आतली बातमी फुटली चित्रपटातील सखूबाई गाणं प्रदर्शित

देवोलीनाचे लग्न

देवोलीनाने २०२२ मध्ये शाहनवाज शेखशी लग्न केले आणि २०२४ मध्ये या कपलला पहिला मुलागा झाला. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, देवोलीनाला 'साथ निभाना साथिया' मधील 'गोपी बहू' च्या भूमिकेसाठी ओळखले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com