Jay pawar news Saam tv
मुंबई/पुणे

तुम्हाला कधीतरी तळमळीने बोलताना पाहावे; अजितदादांच्या आठवणीत जय पवार यांची भावुक पोस्ट

Jay pawar news : अजितदादांच्या आठवणीत जय पवार यांची भावुक पोस्ट केली आहे. जय पवार यांनी इन्स्टाग्रामवर ही पोस्ट केली आहे.

Vishal Gangurde

जय पवार हे अजित पवार यांच्या आठवणीत भावुक

तुम्हाला पुन्हा व्यासपीठावर बोलताना पाहावे, अशी हळवी भावना व्यक्त केलीये

अपघाती विमानाच्या ब्लॅकबॉक्स अहवाल प्रतीक्षेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला बरेच दिवस उलटल्यानंतरही नेते मंडळी, कार्यकर्ते त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. अजित पवारांच्या आठवणीतून त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील क्षणोक्षणी उजाळा देताना दिसत आहे. अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी वडीलांसाठी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली. तुम्ही वेदनादायी आठवण बनवून राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जय पवार यांनी इन्स्टाग्रामवर वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली. जय पवार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, 'तुमचे डोळे आणि तुमचे तेजस्वी रूप पाहताना मनात एकच आस आठवण येते. तुम्हाला कधीतरी व्यासपीठावर उभे राहून त्याच आत्मविश्वासाने आणि त्यास तळमळीने बोलताना पाहावे. पण आता ती फक्त हृदयात जपलेली एक वेदनादायी आठवण बनवून राहिले आहे'.

अजितदादांच्या विमान अपघाताचं कारण समोर येणार

अजितदादांचं अपघाती निधन होऊन आज २७ दिवस उलटले आहेत. त्यांच्या विमानाचा अपघात कसा झाला, याचा तपास यंत्रणाकडून सुरू आहे. त्यांच्या विमान अपघाताचं कारण ब्लॅकबॉक्समधून लवकरच उलगडणार आहे. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागलं आहे.

अजितदादांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा

तत्पूर्वी, अजित पवार यांच्या स्मरणार्थ सोमवारी मुंबईत शोकसभा आयोजित केली होती.या सभेत अनेक मान्यवरांनी अजित पवारांविषयी हळव्या शब्दात भावना व्यक्त केल्या. या सभेत अजितदादांच्या आठवणी सांगताना अनेकांच्या मनात भावना दाटून आल्या होत्या. सभागृहात आमच्या सोबत लोकनेता नसल्याची भावना उपस्थितांच्या शब्दातून जाणवत होती. अजितदादांच्या स्मरणार्थ शोकसभेत महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी नव्या जोमाने कार्यरत राहणे, हीच त्यांना वाहिलेली सर्वोच्च श्रद्धांजली ठरेल,अशी भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT