DEVENDRA FADNAVIS ON CJP PROTEST: ‘SOME PEOPLE HAVE ENTERED WITH A POLITICAL AGENDA’ 
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: आंदोलनात बाहेरचे लोक घुसलेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Delhi LathiCharge: दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यावरून देशातील राजकीय वातावरण तापलंय. आता भाजपकडून आपली भूमिका मांडली जातेय.

Bharat Jadhav

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्या घटनेवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आंदोलनामध्ये काही लोक चांगल्या विचाराने आले. पण काही लोक आपला अजेंडा घेऊन घुसलेत. त्यांना साधं नीट काय आहे, हेही माहिती नाहीये. काही राजकीय पक्षांना ज्यांना त्या त्या राज्यात रिजेक्ट केलंय, तेही त्यात सामील झालेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

पोलिसांच्या गाड्या फोडल्या

दिल्लीत जे आंदोलन झाले, त्यात अनेक राजकीय पक्ष आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल, हा प्रयत्न करत आहेत. अनेक अशा संघटना ज्यांचे या विषयाशी देणे-घेणे नाही. अराजकता कशी पसरवता, येईल याचा प्रयत्न ते करतात. फेसलेस आंदोलन असते त्यावेळी आपण दिल्लीत बघितलं की कशाप्रकारे नेतृत्वहीन, अशा प्रकारची व्यवस्था पाहायला मिळाली. आंदोलनात पोलिसांच्या गाड्या उलथवणं, गाड्या फोडणे अशा अनेक गोष्टी घडल्या.

पोलिसांनी संयम दाखवला - फडणवीस

कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीमार करणं कधीच आवडत नाही. पण आपण काल बघितलं असेल ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती. जर पोलिसांनी नियंत्रण घेतलं नसतं तर अनेक अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम दाखवला आहे. अशा प्रकारचे आंदोलन योग्य पद्धतीने व्हावे यापुरतं जेवढं कारवाई केली पाहिजे, तेवढी पोलिसांनी केली.

याच्या खोलात गेलं तर मी काही सगळ्या आंदोलकांवर कुठलाही आरोप करू इच्छित नाही. काही लोक चांगल्या भावनेने करत असतील. पण हे निश्चित आहे की त्यात असे लोकही घुसले आहेत, ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे. ज्यांना या नीटशी घेणेदेणे नाही. ज्यांना केवळ अराजकता पसरवायची आहे. आंदोलन करणारे काही लोक चांगल्या भावनेने करणारे असू शकतात. हेही तेवढे खरे आहे की काही लोक आपला अजेंडा घेऊन त्यात शिरलेले आहेत हे स्पष्ट दिसतंय.

आंदोलनात हौशे-नवशे सहभागी

अनेकांना नीट काय हे माहीत नाही, कधी परीक्षा झाली हे देखील माहीत नाही. आपआपला अजेंडा सांगत आहेत. याचा अर्थ सगळे एका दिशेने, एका विचारासाठी तिथे आले नाही आहेत. हौशे-नवशे गवशेदेखील आपला अजेंडा राबवायचा प्रयत्न करत आहेत. काही राजकीय पक्ष आहेत, ज्यांना आपल्या राज्यात नाकारले आहेत, असे पक्ष यातून काही मिळवता येईल का असे देखील प्रयत्न करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT