रणजीत माजगावकर, साम टीव्ही
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतून खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिकनंतर आता कोल्हापुरात जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. संताजी घोरपडे असे या उमेदवाराचे नाव आहे. संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता कोल्हापुरात जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सात ते आठ जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचं समजत आहे. या टोळक्याने उमेदवारावर हल्ला केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या जीवघेण्या हल्ल्यावर संताजी घोरपडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संताजी घोरपडे म्हणाले, 'माझ्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्लाला मी घाबरणार नाही. रविवारी रात्री सभा आणि मतदारांच्या भेटीगाठीवरून परत येत असताना अज्ञातांनी माझ्यावर हल्ला केला. मी प्रवास करत असताना अचानक सहा ते सात लोकांनी मला हात दाखवला'.
'मी कार्यकर्ते समजून गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी माझ्यावर अचानक हल्ला केला. मी देखील त्यांचा हल्ला परतवून लावला माझ्यावर हल्ला करून मला भीती दाखवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मी घाबरणारा नाही, असा इशारा घोरपडे यांनी दिला.
दरम्यान, जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांची माहिती आहे. संताजी घोरपडे हे कोल्हापूर करवीर मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास संताजी घोरपडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीत राजकीय उमेदवारांवर हल्ला वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आणखी दोन दिवस राहिले आहेत. तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज पाच वाजल्यानंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.