>> गिरीश कांबळे
''इतका मोठा लाठीमार गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही. हे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभल्यापासून गेल्या वर्षभरापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था लोकांची समस्या लाठीचार्ज होतोय. याबद्दल मी आता जास्त बोलणार नाही. पण शिवसेना या घटनेचा निषेध करते', असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांनी जालना येथे मराठा आंदोलकांनावर झालेल्या लाठीमारवर आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे.
ते म्हणाले, ''लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण देशभरामध्ये मोदींच्या राज्यात आणि महाराष्ट्रात अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंच्या राज्यामध्ये मोर्चे आंदोलन ही लोकशाहीचे हत्यार वापरतील त्यांच्यावर हल्ले करायचे.
संजय राऊत म्हणाले, ''शिंदे यांच्या राज्यांमध्ये ही आंदोलनचं हत्यार वापरतील त्यांच्यावरती अशा प्रकारे पोलिसांच्या माध्यमातून निर्घृण हल्ले करायचे अशा प्रकारचं धोरण दिसत आहे. ज्याप्रकारे मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांचा रक्त सांडलेलं आहे. मला वाटतं या रक्ताचा प्रत्येक थेंब हा वनव्यासारखा पेटल्याशिवाय राहणार नाही. (Latest Marathi News)
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून आपण पूर्णपणे अपयशी आहात. तुमचं वैफल्य जनतेवर काढू नका, अशी माझी हात जोडून विनंती आहे, असं ही राऊत म्हणाले आहेत.
सत्तेची मस्ती आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला बघायला मिळाली: अनिल देशमुख
यावरच बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना इथं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी आज अमानुष लाठीमार केला. सत्तेची मस्ती आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला बघायला मिळाली. राज्य सरकारच्या या कृतीचा मी निषेध करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.