Jaipur-Mumbai Train Firing Update Saam Tv
मुंबई/पुणे

Jaipur-Mumbai Train Firing Update: जयपूर एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण, MIM आमदाराच्या सासऱ्याचा मृत्यू

MIM MLA Father In Law Death: जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता.

Priya More

संजय गडदे, मुंबई

Mumbai News: जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये (Jaipur-Mumbai Train Firing Case) आरपीएफ जवानासह चौघांचा मृत्यू झाला होता. चौथ्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. हा चौथा मृतदेह एमआयएम आमदाराच्या (MIM MLA) सासऱ्याचा असल्याचे समोर आले आहे. हैदराबादवरुन (Hyderabad) मुंबईत येऊन या आमदाराने सासऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. यातील एक मृतदेहाची ओळख पटली नव्हती. यामुळे तो मृतदेह कोणाच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. मात्र मंगळवारी या मृतदेहाची ओळख पटली आहे. हा मृतदेह हैद्राबाद येथील एमआयएम आमदार जफार हुसैन मेराज यांच्या सासऱ्याचा आहे. मंगळवारी रात्री उशिरा हैदराबाद येथून मुंबईत आल्यानंतर या आमदाराने आपल्या सासऱ्याचा मृतदेह भगवती रुग्णालयातून ताब्यात घेतला. यावेळी या आमदारासोबत भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण देखील उपस्थित होते.

दरम्यान, जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. आरपीएफ जवान चेतन सिंहने धावत्या ट्रेनमध्ये आपल्या सहकाऱ्यासह प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. दहिसर ते मीरारोड रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली होती. या गोळीबारामध्ये आरपीएफ पोलिसासह चार प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रेनच्या लोको पायलटने तात्काळ ट्रेन थांबवली. त्यानंतर चेतन सिंहने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला अटक केली.

या गोळीबार प्रकरणाची आता उच्च स्थरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या समतीमध्ये ५ जण असून ते लवकरच या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहेत. त्याचसोबत या गोळीबारामध्ये मृत्यू झालेल्या चौघांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर आरपीएफ जवान आयएसए टिकाराम यांना सरकारी नियमांनुसार मोबदला देण्यात येणार आहे. तसंच या प्रकरणातील आरोपी चेतन सिंहचे मानसिक संतुलन बिघडले असून तो गेल्या ६ महिन्यांपासून यावर उपचार घेत असल्याचे देखील चौकशीतून समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT