Jaipur-Mumbai Train Firing Update: जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार प्रकरण; RPF जवानावर ६ महिन्यांपासून सुरू होते मानसिक उपचार, निद्रानाशाचाही त्रास

Jaipur-Mumbai Superfast Express: जयपूर- मुंबई एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात (Jaipur-Mumbai Train Firing Case) मोठी अपडेट समोर आली आहे.
Jaipur-Mumbai Train Firing News In Marathi
Jaipur-Mumbai Train Firing News In MarathiSaam TV
Published On

सचिन गाड, मुंबई

Jaipur Superfast Express News: जयपूर- मुंबई एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात (Jaipur-Mumbai Train Firing Case) मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी आरपीएफ जवान (RPF Jawan) गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक संतुलनावर उपचार घेत असल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. या जवानाला निद्रानाशाचाही त्रास आहे. असे असताना या जवानाला एक्स्प्रेसमध्ये ड्युटीवर कसे ठेवले असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Jaipur-Mumbai Train Firing News In Marathi
Vijay Vadettiwar News: राज्याला अखेर विरोधीपक्षनेता मिळाला, विजय वडेट्टीवार यांचं नाव फायनल

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करणारा आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंह याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तो गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक संतुलनावर उपचार घेत आहे. त्याचसोबत आरोपीला निद्रानाशाचा देखील त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा जवानाला प्रवाशांनी भरलेल्या एक्स्प्रेसमध्ये एस्कॉर्टची जबादारी कशी देण्यात आली? असा सवाल उपस्थित करत आरपीएफच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह? उपस्थित केले जात आहे.

Jaipur-Mumbai Train Firing News In Marathi
Sanjay Raut On Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघात का होताहेत? भाजपवर निशाणा साधत राऊतांनी थेट कारणच सांगितलं

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. आरपीएफ जवान चेतन सिंहने धावत्या ट्रेनमध्ये आपल्या सहकाऱ्यासह प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. दहिसर ते मीरारोड रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली होती. या गोळीबारामध्ये आरपीएफ पोलिसासह चार प्रवाशांचा मृत्यू झाला.

Jaipur-Mumbai Train Firing News In Marathi
Euphoria Fame Actor Death : वडिलांच्या निधनानंतर आठवडाभरातच प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; वयाच्या 25 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

या घटनेनंतर ट्रेनच्या लोको पायलटने तात्काळ ट्रेन थांबवली. रेल्वे पोलिसांनी आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंहला अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. तसंच या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या रेल्वे प्रवाशांना तात्काळ बोरीवली येथील भगवती रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. आरोपीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याची माहिती आधीच समोर आली होती. अशामध्ये आरोपीची चौकशी केली असता त्याला मानसिक त्रास असून त्याच्यावर सहा महिन्यांपासून उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com