Vijay Vadettiwar News: राज्याला अखेर विरोधीपक्षनेता मिळाला, विजय वडेट्टीवार यांचं नाव फायनल

Vijay Vadettiwar New Opposition Leader: राज्याला अखेर विधानसभेचा विरोधीपक्षनेता मिळाला आहे. काँग्रेस हायकमांडच्या वतीने विजय वडेट्टीवार यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे.
Vijay Vadettiwar is new Leader of Opposition in Maharashtra Legislative Assembly
Vijay Vadettiwar is new Leader of Opposition in Maharashtra Legislative AssemblySaam TV
Published On

Vijay Vadettiwar New Opposition Leader: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याला अखेर विधानसभेचा विरोधीपक्षनेता मिळाला आहे. काँग्रेस हायकमांडच्या वतीने विजय वडेट्टीवार यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे. त्यामुळे वडेट्टीवार हे आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते असणार आहे.

Vijay Vadettiwar is new Leader of Opposition in Maharashtra Legislative Assembly
Samruddhi Mahamarg: शहापूर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सुमारे ४ वर्षांनंतर काँग्रेसकडे चालून आले आहे. या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा होती.

मात्र काँग्रेस हायकमांडकडून अचानक विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी विधानसभेचे विरोधीपक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे होतं. मात्र, अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.

Vijay Vadettiwar is new Leader of Opposition in Maharashtra Legislative Assembly
Sanjay Raut On Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघात का होताहेत? भाजपवर निशाणा साधत राऊतांनी थेट कारणच सांगितलं

त्यानंतर राज्यातील विधानसभेचं विरोधीपक्षनेतेपद रिकामं झालं होतं. त्यामुळे नवा विरोधी पक्षनेता कोण असेल असा प्रश्न निर्माण झाला होता. ठाकरे गटापाठोपाठ राष्ट्रवादीतही फूट पडल्यानंतर विरोधातील पक्षांमध्ये फक्त काँग्रेसकडेच जास्त संख्याबळ होतं.

याच संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला होता. पण, हे विरोधीपक्षनेतेपद कोणत्या नेत्याकडे सोपवायचं असा प्रश्न काँग्रेससमोर होता. दरम्यान, अनेक बैठकानंतर काँग्रेसच्या हायकमांडने आज विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा केली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com