J-J Marg Police Arrested for cheating on gay dating app; The search for the gang began Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : गे डेटींग अ‍ॅपवर फसवणूक करत लुटमार करणारा आरोपी गजाआड; टोळीचा शोध सुरु

J-J Marg Police Arrested for cheating on gay dating app : यावेळी पीडीत डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गे डेटींग अ‍ॅपवर फसवणूक करणाऱ्या टोळीला जे-जे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी गे डेटींग (Gay Dating App) अ‍ॅपवरच्या यूजर्सना चॅटींगद्वारे निर्जनस्थळी बोलवायची आहे नंतर त्यांना मारहाण करत लूटामार करत होती. एका ज्येष्ठ डॉक्टरांना अशाप्रकारे लुबाडण्यात आलं. पीडित डॉक्टरांनी पोलीसांत तक्रार दिल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या पीडित डॉक्टरला आरोपींनी एका निर्जण स्थळी बोलवले आणि नंतर त्यांना मारहाण करत आरोपींनी पीडित डॉक्टरांचं पाकीट, आयफोन (I-Phone) मोबाईल हिसकावला. पीडित डॉक्टरने कसाबसा तिथून पळ काढला आहे. याप्रकरणी जेजे मार्ग पोलिसांनी नतीक नौशाद शेख (२१, रा. मुंब्रा) या तरुणाला अटक केली आहे. (J-J Marg Police Arrested for cheating on gay dating app; The search for the gang began)

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 एप्रिल रोजी एका नामांकित रुग्णालयात काम करणारे आणि परळ येथे राहणारे पीडित डॉक्टर आणि तरुण आणि नतीक नौशाद शेख यांची भेट डेटिंग अॅपवर झाली होती. त्यानंतर त्यांनी नागपाडाजवळील खडा पारसी परिसरात भेटण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरोपी नौशाद शेख याने पीडितेला एका ठिकाणी नेले जेथे त्याचे तीन साथीदार अगोदरच थांबलेले होते. यावेळी आरोपी नतीक नौशाद शेख याने पीडित डॉक्टरला मारहाण केली. त्यांच्या अंगावर वार करून त्यांचा आयफोन आणि पैशांचे पाकीट काढून घेतले. यावेळी पीडीत डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

यांनंतर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यावेळी ते पोलीस म्हणाले की, "आम्ही नशीबवान ठरलो जेव्हा आम्हाला संशयित ज्या ठिकाणाहून ते पळाले होते त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात यशस्वी ठरलो. तसेच, डॉक्टरांनी आम्हाला शेख यांच्याशी ज्या क्रमांकावरून संवाद साधला होता तो नंबरही उपलब्ध करून दिला होता. तेव्हा आम्हाला कळले की संशयित तिथले आहेत. मुंब्रा पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती आरोपीला मिळाली आणि तो लपून बसला. त्याने आपला मोबाईल फोनही बंद केला आणि सोशल मीडियापासूनही तो दूर होता," असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (The arrested person has been identified as Natiq Naushad Shaikh (21), Mumbra resident.)

आरोपीला पकडण्यासाठी असा रचला सापळा

पोलिसांनी माहिती दिली की, "शनिवारी रात्री आरोपी तरुण नतीक नौशाद शेख सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ येणार असल्याची विशिष्ट माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचत आरोपाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पीडित डॉक्टर पोलिसांकडे जाणार नाहीत, असे समजून आरोपींनी डेटिंग अ‍ॅपप्लिकेशनवर पीडितांना टार्गेट केले. आरोपींकडून लुटलेली मालमत्ता परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही आरोपीचीकडून त्याच्या साथीदारांबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी त्याची चौकशी करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने आरोपीला १७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Aksahy Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT