राज ठाकरे उद्यापासून २ दिवस पुण्यात; वसंत मोरेंना फोन, भेटीला बोलावण्याचं नेमकं कारण काय?

Raj Thackeray on a two-day tour of Pune : पुणे शहरातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यात मागील काही दिवसांपासून बेबनाव झाल्याचे दिसून येत आहे.
Raj Thackeray on a two-day tour of Pune
Raj Thackeray on a two-day tour of PuneSaam Tv
Published On

प्राची कुलकर्णी

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या (मंगळवारी) पुण्यात येणार आहे. राज ठाकरे पुण्याच्या २ दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) हे पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तसेच रविवारी झालेल्या मनसेच्या (MNS) मेळाव्यात संदर्भातला आढावाही घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात राज ठाकरे यांची सभा (Punlic Meeting) पुण्यात होणार असल्याची शक्यता आहे. पुणे (Pune) शहरातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यात मागील काही दिवसांपासून बेबनाव झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा आहे. दरम्यान मनसे नेते वसंत मोरेंना राज ठाकरेंनी फोन केला आहे आणि उद्या (मंगळवारी) सकाळी भेटीसाठी मोरेंना बोलावलं आहे. (Raj Thackeray on a two-day tour of Pune; A meeting of office bearers will be held in Pune)

हे देखील पाहा -

1 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे यांनी भोग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या सभेनंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. दरम्यान, औरंगाबाद येथील सभेनंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती मिळते आहे. राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसाठी मनसेकडून परवानगी मागण्यात आली आहे.

पुणे मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ संभाजी वावर यांनी राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात यावी अशा स्वरुपाचं पत्र त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानात ही सभा होणार असल्याचं या पत्रकात नमुद करण्यात आलं आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीची सभा निर्माण न होण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या सूचनेनुसार आम्ही सभेसाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे मैदान निवडले असल्याचं या पत्रकाद्वारे मांडण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आणि वसंत मोरेंच्या भेटीला बोलावल्यामुळे त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com