Bajrang Kharmate Saam TV
मुंबई/पुणे

अनिल परबांशी संबंधित अधिकारी बजरंग खरमाटेंच्या घरी आयकर विभागाचा छापा

भाजपनेते किरिट सोमय्या यांनी अनिल परब यांची बेनामी संपत्ती बजरंग खरमाटेंच्या नावावर असल्याचा आरोप केला होता.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : आज सकाळी युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली होती. त्यानंतर शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांचे निकटवर्तीय परिवहन अधिकारी शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर देखील आयकर विभागाने धाड मारली अशातच आता परब यांच्याशी संबंधित अधिकारी बजरंग खरमाटे (Bajrang Kharmate) यांच्या पुण्यातील घरीही आयकर विभागाने छापेमारी (Income tax department raid) सुरु केली आहे.

बजरंग खरमाटे यांच्या पुण्यातील घरी आयकर विभागाचा छापा सुरु केला आहे. पुण्यातील औंध भागातील खरमाटेंच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी सकाळपासून तळ ठोकून आहेत. भाजपनेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब यांची बेनामी संपत्ती बजरंग खरमाटेंच्या नावावर असल्याचा आरोप करुन काही दिवसांपुर्वी खरमाटेंच्या पुण्याजवळील भुगाव मधील फार्म हाऊसची पाहणी केली होती. त्यानंतर आज आयकर विभागाची टीम खरमाटेंच्या घरी पोहचलीय.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT