महाराष्ट्रात मराठी भाषा भवन ६० वर्षे होऊ शकले नाही हे दुर्दैव - गोवर्धन देशमुख Saam Tv News
मुंबई/पुणे

महाराष्ट्रात मराठी भाषा भवन ६० वर्षे होऊ शकले नाही हे दुर्दैव - गोवर्धन देशमुख

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे मराठी भाषा भवन होणार असल्याचे शासनाने जाहिर केले आहे, अशी माहिती मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिली आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे मराठी भाषा भवन होणार असल्याचे शासनाने जाहिर केले आहे, अशी माहिती मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी आनंद व्यत्त केला असला तरी ''१२ कोटी लोकसंख्या असणाऱ्या एक भाषिक मराठी महाराष्ट्रात आपले स्वतःचे मराठी भाषा भवन ६० वर्षे होऊ शकले नाही हे देखील दुर्दैव आहे'' अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सोबतच मराठी शाळा बुडीत काढण्याऐवजी त्या चकचकीत करुन टिकवल्या पाहिजेत असं आव्हान त्यांनी सरकारला केलं आहे. (It is unfortunate that Marathi Bhasha Bhavan could not be built in Maharashtra for 60 years said Govardhan Deshmukh)

हे देखील पहा -

आपल्या फेसबुक पोस्टद्वारे गोवर्धन देशमुख म्हणतात की, ''मराठी एकीकरण समिती मागच्या अनेक वर्षे मराठी भाषा भवनासाठी पाठपुरावा करतेय, पण शासनाकडून अनेक वेळा आम्हाला लेखी पत्र पाठवून जागे संबधी समस्या सांगितल्या जात होत्या. कधी रंग भवन धोबी तलाव ही जागा, कधी वांद्रे येथील जागा आणि काही वेळा तर नवी मुंबईला करू असे सांगितले जात होते. रंग भवनाची जागा शासनाला का नाही मिळाली हे एक कोडं आहे आणि १२ कोटी लोकसंख्या असणाऱ्या एक भाषिक मराठी महाराष्ट्रात आपले स्वतःचे मराठी भाषा भवन ६० वर्षे होऊ शकले नाही हे देखील दुर्दैव, त्यावर अनेक कारणे दिली गेली. परंतु मराठी भाषा भवन हे राज्याची राजधानी मुंबई येथेच व्हावे अशी आमची इच्छा होती.

शासनाने आता मरीन ड्राइव्ह येथील जागा नक्की केली आहे आणि दिवाळी पर्यंत बांधकाम सुरू करू असे जाहीर केले. हा निर्णय स्वागतार्ह आहे. उशीर झाला आहेच पण, आता स्वतःच्या भाषेचे भवन व्हावे ही अनेक मराठी प्रेमींची इच्छा पूर्ण होतेय याचा आनंद आहे. असेच मुंबईतील मराठी शाळांकडे लक्ष देऊन बुडीत काढण्याऐवजी त्या देखील एकदम चकचकीत करून टिकवण्यासाठी शासनाने पाऊल उचलले पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण हा हक्क हिसकावून घेऊ नये अशी मराठी एकीकरण समितीकडून आम्ही मागणी करत आहोत.''

महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी ही माणूस, मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठी संस्कृतीचे संवर्धन आणि विकासासाठी प्रयत्नशील असणारी संघटना आहे. अलिकडेच त्यांनी मराठी मीरारोड येथील माणसाला घर विकण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधीत व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल झाला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

Maharashtra Politics : बाळासाहेबांशेजारी दिघेंचा फोटो; शिंदे-ठाकरे सेनेत जुंपली, VIDEO

OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

SCROLL FOR NEXT