Vandarshan Railway News  AI Image
मुंबई/पुणे

जबरदस्त! रेल्वे घडवणार 'वनदर्शन', जंगल सफारी, IRCTC चं पर्यटन पॅकेज कसं मिळेल, कधीपासून होणार सुरू? वाचा

IRCTC Vandarshan Railway News : IRCTC च्या ‘वनदर्शन’ उपक्रमांतर्गत १९ नोव्हेंबर २०२६ पासून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्यांची सफर करता येणार आहे.

Alisha Khedekar

  • IRCTC चे ‘वनदर्शन’ विशेष पर्यटन उपक्रम

  • उपक्रमात पाच दिवसांचे पॅकेज

  • १९ नोव्हेंबर २०२६ पासून बुकिंगला सुरुवात

  • ताडोबा, पेंच, बोर, नवेगाव-नागझिरा, उमरेड-पवनी-करांडला आणि टिपेश्वर या ५ पर्यटनस्थळांचा समावेश

तुम्हीसुद्धा निसर्गप्रेमी असाल आणि तुम्हाला फिरायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण रेल्वेने निसर्गप्रेमींसाठी मोठी घोषणा केली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTCद्वारे ‘वनदर्शन’ ही विशेष रेल्वे आणि जंगल सफारी सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत पर्यटकांना रेल्वे प्रवासासह राहण्याची सोया, वाहतूक व्यवस्था आणि जंगल सफारीचा आनंद एकाच पॅकेजमध्ये घेता येणार आहे. हे पॅकेज पाच दिवसांचं असणार आहे. या उपक्रमाची सुरुवात १९ नोव्हेंबर २०२६ पासून होणार आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्यांना भेट देण्यासाठी रेल्वेने हा उपक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या सहकार्याने तयार केलेल्या या पर्यटन पॅकेजमुळे पर्यटकांना प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोयीचे होणार आहे. विशेष म्हणजे, या पॅकेजमध्ये जंगल सफारीसाठी परवान्यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याने पर्यटकांना सफारीचे नियोजन करताना मदत मिळणार आहे.

पाच वेगवेगळ्या पर्यटन मार्गांचा समावेश

IRCTCने या उपक्रमासाठी रेल्वेने एकूण पाच ठिकाणं निवडली आहेत. यामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, उमरेड-पवनी-करांडला वन्यजीव अभयारण्य आणि टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य या ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटकांना आपल्या आवडीनुसार जंगल पर्यटनाचा पर्याय निवडता येणार आहे. तसेच यासाठी रेल्वेने चार रात्री आणि पाच दिवसांचं पॅकेज ठरवले आहे. तसेच मुंबईहून प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी विदर्भ एक्स्प्रेस (१२१०५) या रेल्वेगाडीची सुविधा उपलब्ध असेल. ही गाडी दर गुरुवारी सुटणार आहे. परतीच्या प्रवासासाठी गोंदिया येथून १२१०६ क्रमांकाच्या गाडीने रविवारी प्रवास करता येईल. निवडलेल्या पॅकेजनुसार प्रवासासाठी चढण्याचे आणि उतरण्याचे स्थानक वेगवेगळे असू शकते.

आगाऊ बुकिंग महत्त्वाचे

या विशेष पर्यटन पॅकेजसाठी प्रत्येक फेरीत एसी थ्री टियर (३AC) आणि एसी टू टियर (२AC) श्रेणीतील प्रत्येकी सहा बर्थ राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उपलब्ध जागांची संख्या मर्यादित असणार आहे. रेल्वे प्रवास आणि वन्यजीव पर्यटन यांची सांगड घालून पर्यटकांना एकाच बुकिंगमध्ये संपूर्ण पर्यटनाचा अनुभव देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. जंगल सफारीसाठी वन विभागाचे नियम लागू असल्याने पर्यटकांनी वेळेत आरक्षण करणे आवश्यक आहे. विशेषतः सुट्ट्यांच्या हंगामात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, इच्छुकांनी पर्यटनाचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण कोर्टात पगारवाढीसाठी आंदोलन, २० महिन्यांनंतरही दखल नाही, ५ तारखेला सामूहिक रजेवर जाणार

सलग तीन दिवस सुट्टी जाहीर! शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालय राहणार बंद; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात सुरू, तरी टँकरने BRT डिव्हायडर धुतले! नागरिकांचा संताप

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

Retirement news: 17 वर्षांची कारकिर्द, वनडेत 2 हजारांपेक्षा जास्त रन्स...! भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा

SCROLL FOR NEXT