Vijay Khairnar : मालेगावच्या चिमुकलीला अखेर न्याय! आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा

Nashik Malegaon Rape Case Vijay Khairnar News : नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे चिमुकली हत्या प्रकरणाचा दहा महिन्यांत निकाल. मालेगाव जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
Nashik Malegaon Dongarale Vijay Khairnar News
Nashik Malegaon Dongarale Vijay Khairnar News Saam tv
Published On: 
Summary
  • मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीच्या हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा

  • पीडितेच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश

  • पोलिसांनी न्यायालयात २२५ पानांचे आरोपपत्र सादर केले

पुण्यातील नसरापूर येथील घडलेल्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मालेगाव येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. यासोबतच पीडितेच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार , १६ नोव्हेंबर २०२५ रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. आरोपीने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीला आपल्या जवळ बोलावले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी नागरिकांनी विविध ठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात आला. दहा महिन्यांत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या कालावधीत न्यायालयात एकूण ५० सुनावण्या झाल्याची माहिती आहे.

Nashik Malegaon Dongarale Vijay Khairnar News
Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? सरन्यायाधीशांवरील वक्तव्य भोवले; राऊतांनी मागितली माफी, म्हणाले...

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी न्यायालयात २२५ पानांचे आरोपपत्र सादर केले होते. खटल्यादरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थ, पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली. सरकारी पक्षाकडून एकूण २४ महत्त्वाच्या साक्षीदारांची तपासणी करण्यात आली, तर बचाव पक्षाच्या दोन साक्षीदारांचीही साक्ष घेण्यात आली. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आरोपीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती.

Nashik Malegaon Dongarale Vijay Khairnar News
Ladki Bahin Yojana : पात्र असताना १५०० रुपये बंद, लाडक्या बहिणींचा वर्षावर आंदोलनाचा इशारा

तसेच त्याच्या वागणुकीसंदर्भातील अहवालही न्यायालयासमोर सादर करण्यात आले. यामध्ये कारागृह प्रशासन, पोलीस आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या अहवालांचा समावेश होता. या घटनेनंतर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. न्यायालयाच्या निकालामुळे या प्रकरणातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र, फाशीच्या शिक्षेवरील पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि अपील यांनुसार या प्रकरणाची पुढील वाटचाल ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com