गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई करावी; ईराणी समाजाकडून मागणी Saam Tv
मुंबई/पुणे

गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई करावी; ईराणी समाजाकडून मागणी

13 दिवसांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्याबाहेर उपोषण सुरु

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे - अखिल भारतीय ईराणी समाजाच्यावतीने शिवाजीनगर Shivaji Nagar येथील गुन्हेगारी तसेच अनधिकृत व्यवसायिकांना आळा घालण्यासाठी या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात यावी तसेच येथे राहत असलेल्या या समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मदत करावी आणि जे गुन्हेगार दहशत माजवत आहे. अश्या लोकांवर कारवाई करण्यात यावी अश्या विविध मागणीसाठी गेल्या 13  दिवसांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar पुतळ्याच्याबाहेर उपोषण सुरु करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

तरुणांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे

शिवाजीनगर येथील पाटील स्टेट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून इराणी समज राहत आहे.काही गुन्हेगारी करणाऱ्या लोकांच्यामुळे परिसरात काहीही झालं कि या समाजाच्याच लोकांनी गुन्हे केलं आहे असं समजून या समाजातील तरुणांना अटक करणे तसेच जे गुन्हेगार व्यक्ती आहे ते या समाजातील तरुणांना धमकावून गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त केलं जात आहे.आज या समाजातील तरुण - तरुणी हे शिक्षणापासून वंचित राहत आहे.या समजातील तरुणांना शिक्षणासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने मदत करावी.तसेच येथे चालत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही लावण्यात यावे. या समाजाच्या लोकांना रोजगार मिळावं यासाठी विविध उपाय योजना कराव्या अशी मागणी यावेळी अखिल भारतीय इराणी समाजाचे अध्यक्ष अलिरझा ईराणी यांनी केली आहे.

गुन्हेगारी करणाऱ्या लोकांवर लवकरात लवकर कारवाई करावी

आज या समाजाच्या तरुणांना गुन्हेगारीप्रवृत्तीचे जे लोक आहे ते या तरुणांना धमकावून त्यांना नशा करणे,गुन्हेगारी करणे यासाठी प्रवृत्त करत आहे.आज सर्वच समाजाचे लोक हे शिक्षण घेऊन पूढे जात आहे मात्र याच समाजाचे काही गुन्हेगार लोक या तरुणांना पुढे जाऊ देत नाही.त्यांना त्यांच्यातच अडकावून ठेवत आहे.यासाठी प्रशासनाने काहीतरी प्रयत्न केल पाहिजे आणि जे खुलेआम गुन्हेगारी करत आहे अश्या लोकांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT