Abhishek Ghosalkar Murder Case Update  Saam TV
मुंबई/पुणे

Breaking News: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Abhishek Ghosalkar News: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास जलद गतीने तपास व्हावा, यासाठी हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे.

Satish Daud

Abhishek Ghosalkar Murder Case Update

मुंबईच्या दहिसर परिसरात गुरुवारी (८ फेब्रुवारी) एक भयानक घटना घडली. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरीस नोरोन्हो या व्यक्तीने त्यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर आरोपीने स्वत:ला देखील संपवलं. या थरारक घटनेनं मुंबईसह संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या १० दिवसात मुंबईत गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा जलद गतीने तपास व्हावा, यासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे. या संदर्भात मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या जुन्या वादातून झाली असावी, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही हत्या प्री प्लान असून आरोपी मॉरीस याने घोसाळकर यांना फोन करून आपल्याला ऑफिसला बोलावून घेतलं. त्यानंतर फेसबुक लाईव्ह करत त्यांची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, घटनास्थळावरून आम्ही पुरावे ताब्यात घेतले असून हत्या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जाईल, असंही गुन्हे शाखेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काय नवीन माहिती समोर येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, या घटनेनं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे.

कोण आहेत अभिषेक घोसाळकर?

अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. विनोद घोसाळकर २००९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेचे आमदार होते. मुंबईतील दहिसर मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही काम केले आहे. अभिषेक घोसाळकर हेही माजी नगरसेवक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT