Nagpur Accident News
Nagpur Accident NewsSaam Tv

Nagpur News: नागपूरमध्ये महिला मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

Nagpur Accident News: नागपूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील भिवापूर तालुक्यातील बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिला मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Published on

Nagpur Accident News:

नागपूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. येथील भिवापूर तालुक्यातील बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिला मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कामगार महिला कामानिमित्त बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

या अपघाताचा तीन महिलांचा मृत्यू झाला असून काही महिला जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुरीसाठी या महिला एका वाहनात आल्या होत्या. परत जात असताना चालकांचा नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. ज्यात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagpur Accident News
Who Is Abhishek Ghosalkar: कोण आहेत अभिषेक घोसाळकर? ज्यांचा दहिसरमधील गोळीबारात मृत्यू झाला

छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातात तरुणाचा मृत्यू

दरम्यान, गुरुवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्येही भीषण अपघात झाला आहे. अपघातात बसने दुचाकीला धडक देत १०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ढोरेगाव येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसने सुचला जोरदार धडक दिली. या अपघातग्रस्त दुचाकीवरून तिघेही न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरेगाव येथे बारावीत शिक्षण घेत होते. कॉलेज सुटल्यानंतर तिघे एकाच दुचाकीने ढोरेगाव रोड क्रॉस करत होते.

Nagpur Accident News
Abhishek Ghosalkar Death: गोळीबारात ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, पोलीस उपआयुक्त रोशन यांनी दिली माहिती

अचानक मध्यभागी आले असता छत्रपती संभाजीनगरवरून फलटणच्या दिशेने निघालेल्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन विद्यार्थी दूर फेकले गेले. तर एक बसच्या खाली दुचाकीसह तब्बल १०० फूट अंतरापर्यंत फरपटत गेला. यात किरण दत्तात्रेय काजळे (रा. आनंदवाडी) याचा जागीच मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com