म्हाडा पेपरफुटी प्रकरण; पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्याची सूचना Saam Tv
मुंबई/पुणे

म्हाडा पेपरफुटी प्रकरण; पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्याची सूचना

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : आरोग्य भरतीत पेपर फुटला आणि त्यानंतर आरोपी पकडण्यात आले आहेत. त्यामुळे म्हाडा (MHADA) परिक्षेच्या वेळी आरोपींनी प्लॅन बी ची तयारी केली होती. पेपर फोडता आला नाही तर परीक्षेनंतर ज्या विद्यार्थ्यांना (students) बरोबर व्यवहार झाला होता. त्यांचे गुण वाढवून देण्याचा प्लॅन होता. पण पोलिसांनी (police) पेपर फोडण्याच्या आधीच आरोपींना पकडल्यामुळे भांडाफोड झाला आहे. म्हाडा पेपरफुटी प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि जी. ए. टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख याने एजंटांमार्फत विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्याची योजना आखण्यात आली होती. मुख्य आरोपीच्या संपर्कात असलेले राज्यातील १० एजंट पोलिसांच्या रडारवर असून, त्यांचा शोध सुरू आहे. पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. नंतर संबंधित विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणार असल्याचेही समोर आले आहे.

हे १० एजंट राज्याच्या वेगवेगळ्या भागात काम करणारे होते. तपासात अडचण निर्माण व्हायला नको म्हणून पोलिसांनी अद्याप जागांची नावे जाहीर करण्यास नकार दिला आहे, राज्याच्या वेगवेगळ्या भागात तपासासाठी पोलिसांच्या टीम पाठवण्यात आली आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

Kalyan Crime : डिलिव्हरी बॉय, पण काम भयंकर, व्हिडिओ बघून सर्वच हैराण; CCTV पाहा

SCROLL FOR NEXT